शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

खडसे, महाजन यांच्यात अध्यक्षपदावरून रस्सीखेच

By admin | Updated: March 21, 2017 00:21 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी रात्री उशिरार्पयत हालचाली फुटीच्या भीतीने भाजपाने नाव जाहीर करणे टाळले दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची आघाडी

जळगाव : जि.प. अध्यक्षपदावरून भाजपामध्ये गटबाजी सुरू झाली असून, माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातच त्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. यामुळेच की काय, सोमवारी सायंकाळी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होऊनही त्यात जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होईल याचा निर्णय झाला नाही. यातच जि.प.मध्ये  भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्षपदासाठी तर  शिवसेनेतर्फे उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या वृत्तास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील व राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दुजोरा दिला. दोन्ही नेत्यांमध्ये मर्जीतील उमेदवारासाठी  प्रय}भाजपामध्ये अध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच मागील दोन दिवसांपासूनच सुरू झाली. ती सोमवारीही कायम होती. त्यात खडसे गटाने माधुरी अत्तरदे, उज्‍जवला पाटील व ज्योती राकेश पाटील यांची नावे लावून धरली. तर महाजन गटाने रजनी जे.चव्हाण व नंदा अमोल पाटील यांच्या नावांसाठी आग्रह केल्याची माहिती मिळाली. यावरूनच भाजपामध्ये सरळ दोन गट पडले आहेत. नंतर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये अध्यक्षपद दिले जावे, अशी चर्चाही सुरू झाली. यात काही पदाधिका:यांनी रजनी चव्हाण यांच्या रुपाने पुन्हा जामनेरात अध्यक्षपद दिले जावे, असे रेटाही सुरू केल्याचे समजते. सोमवारी रात्री महाजन गटाने आपल्या गटाचा अध्यक्ष व्हावा यासाठी शिवसेनेच्या मदतीसाठी हालचाली सुरू केल्या. शिवसेनेच्या काही नेत्यांशी भाजपाकडून संपर्कही साधण्यात आला. यासंदर्भात जलसंपदामंत्री महाजन यांना विचारले असता सेनेशी युती होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. यासंदर्भात पुढे काय हालचाली होतात ते पाहू, असे सूचक विधानही महाजन यांनी केले. तर राज्यमंत्री गुलाबराव यांनीही भाजपासोबत ऐनवेळी चर्चा करण्याची तयारी असल्याचे संकेत दिले. गटबाजी लक्षात घेता सोमवारी सायंकाळी भाजपाच्या कार्यालयात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, उन्मेष पाटील, संजय सावकारे, स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय पाटील, सरचिटणीस सदाशिव पाटील उपस्थित होते. पाऊण तास ही बैठक चालली. युतीबाबत सेनेच्या बैठकीत चर्चाशिवसेनेची बैठक दुपारी अजिंठा विश्रामगृहात झाली. त्यात जि.प.अध्यक्षपदाबाबत झालेल्या निर्णयाची माहिती सदस्यांना देण्यात आली. तसेच भाजपासोबतची युती करावी की नाही याबाबतही मते जाणून घेण्यात आली. त्यात राज्यमंत्री पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. खडसेंचा शिवसेनेसोबत युतीस नकारशिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी एकनाथराव खडसे यांना विचारले असता शिवसेनेसोबत कुठलीही युती होणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच जि.प.अध्यक्षपदाबाबत सर्वानुमते निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपासोबत जाण्यास काँग्रेसमध्ये काहींचा होकारजि.प.मध्ये सत्तेत काँग्रेसला भाजपा सहभागी करून घेत असेल तर त्यात कुठलीही चूक नाही. आपल्या पदाधिका:यांच्या माध्यमातून कामे करता येतील, तसेच पक्षाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेत एखादे पदही राहील, असे मतप्रवाह काही पदाधिका:यांनी व्यक्त केला. पण त्यास काही पदाधिका:यांनी नकार दिला. भाजपाच काँग्रेसचा पहिला शत्रू असल्याचे काहींनी सांगितले. काँग्रेसच्या अरुणा रामदास पाटील यादेखील काँग्रेसच्या गटनोंदणीला सोमवारी आल्या नाहीत. त्यादेखील अध्यक्ष निवडीला काँग्रेससोबत नसल्याची चर्चा होती. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, अरुणा पाटील यांचे पती आर.जी.पाटील यांच्याशी संपर्क साधला. ते येतो, असे म्हटले. पण आलेच नाही. तीन सदस्य आमच्याकडे आहेत. जे पक्षविरोधी काम करतील ते अपात्र होतील, अध्यक्ष निवडीच्या सभेला गैरहजर                       राहील्यासही संबंधित  सदस्य अपात्र होईल, असेही अॅड.पाटील म्हणाले. तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. गटनोंदणी केलीच पाहीजे, अशी गरज नाही. अध्यक्ष निवडीनंतरही काँग्रेस गटनोंदणी करू शकतो, असेही अॅड.पाटील यांनी सांगितले. दोन्ही काँग्रेस व सेनेने एकत्र येऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विवरे वाघोदा गटातील सदस्य आत्माराम कोळी, आसोदा ममुराबाद गटातील पल्लवी जितेंद्र पाटील व दहिवत पातोंडा गटातील सदस्या मिना रमेश पाटील हे संपर्काबाहेर आहेत. हे तिघे सदस्य भाजपासोबत गेले किंवा अनुपस्थित राहीले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल. त्याबाबतचे कायदे कडक          असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी दिली. आज जाहीर करणार नाव भाजपातर्फे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची नावे 21 रोजी जाहीर होतील. त्याचे  अधिकार कोअर कमिटीने जलसंपदामंत्री महाजन, माजी मंत्री खडसे व जिल्हाध्यक्ष वाघ यांना दिल्याची माहिती सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करताना देण्यात आली.