भुसावळ : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सर्व रस्ते कात टाकत असून, रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे, मात्र विरोधकांनी होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी वेळोवेळी केल्या आहेत. याकरिता माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दुपारी जळगाव रस्त्यावर सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची पाहणी केली.
सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाबद्दल समाधान व्यक्त करून शहरातील सर्वच रस्ते गुणवत्तापूर्वक करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. सुनील नेवे, माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, मक्तेदार विनय सोनू बढे, पुरुषोत्तम नारखेडे, बोधराज चौधरी, वसंत पाटील, देवा वाणी, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, दिनेश नेमाडे, मुकेश पाटील, अमोल इंगळे, मुकेश गुंजाळ, राज खरात, प्रशांत नरवाडे, संदेश सुरवाडे, अनिकेत पाटील, श्याम भारंबे, एजाज खान, उसामा खान, पृथ्वीराज पाटील, यशांक पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.