शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव शहराजवळील खडकी बुद्रुक येथे आगीत झोपडी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:14 IST

घर बांधकामासाठी जमविलेली एक लाखांची रक्कम खाक

ठळक मुद्देघर बांधकामासाठी जमविलेली एक लाखांची रक्कम खाकअग्निशमन विभागाच्या बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यातदोन ते अडीच लाखांचे झाले नुकसान

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.२८ : चाळीसगाव शहरापासून पश्चिमेला अवघ्या चार किमी अंतरावर असणा-या खडकी बुद्रुक गावात मजुरी करणा-या ग्रामस्थाची झोपडी आगीत जळून खाक झाली. घर बांधकामासाठी जमवलेल्या एक लाख रुपयांची देखील आगीत राख झाली. ही घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता घडली.खडकी बुदु्रक येथे पाण्याच्या टाकी जवळ सिद्धार्थ सोमा चव्हाण यांचे झोपडीवजा घर असून ते बांधकामावर मजुर काम करतात. दुपारी साडे बारा वाजता त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केल्याने सर्व संसारपयोगी वस्तू, धान्य, कपडे यांची आगीत राख झाली. आग लागल्याचे समजातच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.दुपारी पाऊण वाजता चाळीसगाव पालिकेच्या अग्निशमन केंद्राला कळविण्यात आले. यानंतर एक बंब पाणी टाकून आग आटोक्यात आली.चव्हाण यांना घराचे बांधकाम करावयाचे होते. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ते पैसे जमवित होते. आगीत एक लाख रुपयांच्या नोटांचीही राख झाली आहे. दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

टॅग्स :Chalisgaonचाळीसगावfireआग