शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कासोदा येथे पाण्याअभावी शालेय पोषण आहार शिजलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:43 IST

धक्कादायक प्रकार

कासोदा, ता.एरंडोल : येथील साधना माध्यमिक विद्यालयात बुधवार, ६ रोजी पाणी उपलब्ध न झाल्याने शालेय पोषण आहाराची खिचडी शिजू शकली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याुमळे सुमारे चारशेच्यावर विद्यार्थी पोषण आहारापासून वंचीत राहिले. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पालक वर्गातून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात, असे संकेत वरिष्ठांनी दिले आहे.येथील नावाजलेल्या साधना माध्यमिक विद्यालयात दररोज सुमारे चारशेच्यावर विद्यार्थी पोषण आहाराचा लाभ घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी येथे खिचडी शिजविली जाते. मात्र ६ रोजी येथे खिचडी शिजलीच नाही. येथे असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नसल्याने खिचडी शिजविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे शाळेत इतरत्र कोठून पाणी आणून पोषण आहार तयार करण्याची तसदीदेखील घेतली गेली नाही व विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले. पाण्याअभावीच पोषण आहार शिजू शकला नाही, असे खुद्द शाळेच्या प्राचार्यांनी मान्य केले.जेवणानंतर पाणी नसतेजेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी येथे पाणीदेखील नसते, अशी माहिती मिळालीे. शाळेत जी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे ती कोरडीच असल्याचे आढळून आले. एरव्ही नेहमी येथे पाणी टँकरद्वारे येते का, ते पाणी पिण्या योग्य असते का, टाकी नेहमी स्वच्छ केली जाते का, पाणी कुठून आणले जाते, याबाबत आता या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न येथे गंभीर आहे. वरीष्ठ अधिकारी व संस्था चालकांनी या विद्यालयाकडे लक्ष देऊन विद्यालयची गुणवत्ता व नावलौकीक पूर्वी सारखाच मिळवून द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.दरम्यान, बुधवारी झालेल्या प्रकाराची कुठलीही माहिती वरीष्ठांना कळविण्यात न आल्याने हा प्रकार नेहमीच होत असावा, खोटी बिलं टाकून अनुदान लाटण्यात येत असावे, अशा अनेक चर्चा आज गावात सुरु होत्या. वरिष्ठांनी या प्रकाराची कसून चौकशी करावी, असा प्रकार या आधी सुद्धा झाला काय, याबाबत शोध घ्यावा, अशी मागणी पालक वगार्तून होत आहे.येथील साधना विद्यालय येथील एक प्रतिष्ठित विद्यालय म्हणून ओळखले जाते. मात्र विद्यालयाच्या शैक्षणिक व इतर कामकाजामुळे जनतेतून या विद्यालयाबाबतचे आकर्षण पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्याचा परिणाम पटसंख्येवरदेखील होऊ लागला आहे. सध्या प्राचार्य अमळनेर येथून ये-जा करतात, त्यामुळे शाळेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.पाण्याची व्यवस्था न झाल्याने खिचडी शिजवण्यात आली नाही. यापुढे काळजी घेतली जाईल.- एम.ए. पाटील, प्राचार्य, साधना विद्यालय, कासोदाकासोदा येथे झालेला प्रकार गंभीर असून त्याची चौकशी होईल. दोषी आढळल्यास गुन्हेदेखील दाखल होतील. कारण विद्यालयाकडून याबाबत तालुकास्तरावर कोणतीही माहिती कळवण्यात आलेली नाही.-विश्वास पाटील, अधीक्षक, शालेय पोषण आहार, पं.स.एरंडोल

टॅग्स :Jalgaonजळगाव