केळकर यांनी १६९ दिवस प्रवास करून २००० कि.मी.चे अंतर रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अकोला व जळगाव असा प्रवास केला असून, अजून दोन हजार किमीचे अंतर धुळे, नंदूरबार, नाशिकमार्गे नगर, शिवनेरी असे मार्गक्रमण करायचे असल्याचे सांगितले.
कोरोनाकाळात कार्य करीत असलेले डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या संघटना आहेत; परंतु रुग्ण व त्याचे कुटुंबीय हे मात्र एकटे आहेत. त्यामुळे आधार देणे, त्यांचे मनोधैर्य वाढविणे, सर्वतोपरी मदतीसाठी समाज पाठिंबा उभारणे, त्यांना विमाकवच मिळवून द्यावे, तसेच पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्याकामी मार्गदर्शन व सहकार्य करणे, हाच पदयात्रा मागे उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिव सुभाष तायडे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांनी परिचय करून दिला. यावेळी संघटक जगन्नाथ तळेले, सहसंघटक मकसूद बोहरी, कोषाध्यक्ष कल्पना तेंबाणी, सहकोषाध्यक्षा कल्पना मुठे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, जिल्हा न्याय व विधी समितीप्रमुख लताई साहेब, भारती अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी वनश्री अमृतकर, ज्योती भावसार व नूतन सदस्या तायडे, जिल्हा कृषी समितीप्रमुख डॉ. एन. आर. पाटील, शिक्षण समितीप्रमुख सुधाकर पाटील, संघटक शरद गीते उपस्थित होते. भारती अग्रवाल यांनी पत्राचे वाचन केले. कल्पना मुठे यांनी आभार केले.