शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पुण्यकाळात दर्शनासाठी कार्तिक स्वामी मंदिर गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:54 IST

श्री अयप्पा स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ठळक मुद्दे‘मुरगण हरो हरा’चा जयघोषमुहूर्तावर अभिषेक

जळगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त शहरातील कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येऊन भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. २३ रोजी संध्याकाळी पुण्यकाळी असल्याने शुक्रवारी सकाळपासूनन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.२२ रोजी मुहूर्तावर अभिषेक, पूजा विधी होऊन भाविकांनी विशेषत: महिलांनी निवृत्तीनगरातील मंदिरात गर्दी केली होती़ या वेळी ‘मुरगण हरो हरा’ अर्थात कार्तिक स्वामींचा जयघोष भाविकांनी केला. या सोबतच औद्योगिक वसाहत परिसरातील श्री विश्वनाथ मंदिर, शिवपंचायत मंदिर तसेच ओमशांती नगरातील मंदिरामध्येही विविध कार्यक्रम उत्साहात झाले.केरळी महिला ट्रस्टतर्फे निवृत्तीनगरात स्थापन करण्यात आलेल्या श्री अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये २२ रोजी सकाळी ११ वाजता कैरली पुरोहिताच्या मंत्रोच्चारात ३३ वस्तुंनी कार्तिक स्वामींचा अभिषेक करण्यात आला. या वेळी असंख्य भाविक उपस्थित होते. दुपारी १.१० वाजता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले व महाआरती झाली. केरळात कार्तिक स्वामींना ‘मुरगण’ असे नाव असून या वेळी ‘मुरगण हरो हरा’ असा जयघोष करण्यात आला.दर्शनाचा पुण्यकाळगुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता कृतिका नक्षत्रास सुरुवात झाली. कार्तिक महिना, कृतिका नक्षत्र व त्यात कार्तिक स्वामींचे दर्शन हा पवित्र काळ मानला जातो. याच काळात अनेक जण अभिषेक करून घेतात व त्यामुळे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्या मुळे संध्याकाली ५.३० वाजेपासून दर्शन घेण्यात आले. २३ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा योग असल्याने या काळात दर्शनासाठी गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत दर्शनाकरीता गर्दी झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.यासाठी ट्रस्टच्या अध्यक्षा वासंती अय्यर, श्रीजा अशोकन, रजनी प्रदीप, श्रीजा शामलन, संधी दामोदरन, शुभा वेणुगोपाल, जानकी दामोदरन, राजी नायर, राजी शशी, तनुजा अजीत, गंगा संजीवन, जिनीया अजू, बिंदू उन्नीकृष्णन, सोफी सुनील यासह पुरुष मंडळींचेही सहकार्य मिळाले.मोरपिसांची अनोखी श्रध्दाकार्तिक स्वामींचे मोर हे वाहन आहे़ त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी जाताना भाविक सोबत मोराचे पीस घेवून जातात़ कार्तिक स्वामींच्या पायाला या मोरांचा स्पर्श करून ते घराच्या देव्हाऱ्यात ठेवल्यास आरोग्य व सुखसमृध्दी नांदते अशी श्रध्दा भक्तगणांची आहे. नागरिकांची ही भावना लक्षात घेऊन निवृत्तीनगरात असलेल्या मंदिराच्या परिसरात मोरपिसांची विक्री सुरू होती.औद्योगिक वसाहतीमधील जे - ३२ परिसरातील श्री विश्वनाथ मंदिरात पूजा विधी, आरती करण्यात आली़ या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता आरती होऊन रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले होते. तसेच २३ रोजी पहाटे महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार असून भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विमल राठी यांनी केले आहे़औद्योगिक वसाहतीमध्ये ई - ८ सेक्टरमधील शिवपंचायत मंदिरातही कार्तिक स्वामी महोत्सव झाला. २२ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून अभिषेक, आरती असे विविध कार्यक्रम झाले. २३ रोजी संध्याकाळपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले आहे. दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील मंत्री, मनिषा मंत्री यांनी केले आहे़ ओमशांती नगरातील श्री शिव शंकर मंदिराच्या प्रांगणात श्री कार्तिक स्वामींचे मंदिरातही धार्मिक कार्यक्रम झाले.

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराJalgaonजळगाव