पाचोरा : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे २६ जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला. राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रा. स्व. सेवक संघाचे तालुका संघचालक दिनेश अग्रवाल, जवान फाैंडेशनचे सल्लागार इंद्रसिंग पाटील, उत्तमसिंग निकुंभ, इतिहास संकलन समितीचे रवींद्र पाटील, भारत महाराज प्रमुख उपस्थित होते.
रवींद्र पाटील यांनी कारगिल युद्धाची माहिती सांगितली. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन वि. हिं. परिषदेचे प्रखंडप्रमुख महावीर गौड यांनी केले. सूत्रसंचालन किरण कुंभार यांनी केले. बजरंग दलाचे अतुल पाटील, बालाजी वस्ती प्रमुख अमित शर्मा यांनी परिश्रम घेतले.