शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२५ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन : जळगावात एन.मुक्टोचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:04 IST

विविध विषयांवर चर्चा

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (एन.मुक्टो)तर्फे खोटेनगरात सोमवारी जिल्हा मेळावा झाला. या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घाईगर्दीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत टीका करण्यात आली. तसेच सप्टेंबर महिन्यात संघटनेच्या विविध ११ मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.अध्यक्षस्थानी एन.मुक्टोचे प्रा.डॉ.संजय सोनवणे होते. प्रारंभी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघावर उपाध्यक्ष व सहसचिव तसेच कार्यकारिणी सदस्य, जनरल कौन्सिलवर निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रा.बी.पी.सावखेडकर, धुळे जिल्हाध्यक्ष डॉ.मनोहर पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहते, प्रा.डॉ.किशोर कोल्हे,डॉ.संध्या सोनवणे, विद्या परिषदसदस्य डॉ.शुभांगी राठी उपस्थित होते. प्रा.सावखेडकर यांनी सीबीसीएस बाबत विद्यापीठाकडून कशा पद्धतीने घिसडघाई चालली आहे? त्याबाबत संघटनेची भूमिका काय? याबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षीयभाषणात डॉ.सोनवणे यांनी उमविच्या निर्णय प्रक्रियेवर व सरकारच्या शिक्षक विरोधी धोरणावर टीका केली. प्राध्यापकांच्या ७१ दिवसांनच्या वेतनाचा प्रश्न, रिक्तपदे, सातवा वेतन आयोग, नवीन पेन्शन योजना रद्द करणे, कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न यासह ११ मागण्यांसाठी सप्टेंबर महिना हा आंदोलनाचा महिना असेल असे जाहीर केले. त्यानुसार पहिला टप्पा आंदोलन विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ६ आॅगस्ट रोजी काळ्याफिती आंदोलन, २० ते ३१ आॅगस्ट सहसंचालक/ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, ४ सप्टेंबर रोजी ‘काळा दिवस व कोर्ट अ‍ॅरेस्ट, ११ सप्टेंबर रोजी एक दिवस काम बंद आंदोलन, २५ सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.दिलीप चव्हाण यांनी तर आभार डॉ.अजय पाटील यांनी मानले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव