शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कलगी तुरा - खडसे समर्थकांनी व्हायरल केले राष्ट्रवादीत प्रवेश करणारे भाजप पदाधिकारी असल्याचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:09 IST

माजी मंत्रीद्वय गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यातील कलगीतुरा वाढत आहे.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : माजी मंत्रीद्वय गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यातील कलगीतुरा वाढत आहे. ह्यमंगळवारी भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते भाजपचे नाहीत. उसने अवसान आणण्याचा हा कार्यक्रम होताह्ण, असे उत्तर जामनेर भाजपने दिल्यानंतर खडसेंच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रवेश घेणाऱ्यांचे भाजप सदस्यत्व आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करून शिमगा दिला.जामनेर तालुक्यातील देवपिंप्री आणि नेरी बुद्रूक येथील २०० कार्यकर्त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री खडसे यांनी अधिकृतरित्या ट्विटरवरून ही माहिती दिली.दरम्यान, ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यातला एकही कार्यकर्ता भाजपचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने उसने अवसान आणून सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता, यात एकही भाजपचा प्राथमिक सदस्य नाही, असे जामनेर भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रसिद्धीस दिले. यावर खडसेंच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रवेश करणाऱ्यांचे प्राथमिक सदस्यत्व आणि माजी मंत्री महाजन यांच्यासोबत या कार्यकर्त्याचे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून प्रतिउत्तर दिले आहे. अद्याप यावर भाजप गोटातून प्रतिक्रिया आलेली नाही. एक मात्र निश्चित या प्रवेशामुळे सोशल मीडियात आरोप प्रत्यारोपात खडसे समर्थक भारी पडल्याचे काही व्हाट्सएपच्या ग्रुपवर दिसून आले.विशेष म्हणजे कोणत्याही निवडणुका नसताना कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत असल्याने निवडणुका नसताना निवडणुकीचा भास मात्र जाणवत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर