शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्विकृत सदस्यांसाठी भाजपमध्ये रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:21 IST

जळगाव : मनपातील भाजपच्या चारपैकी दोन सदस्यांच्या जागेवर इतर दोन सदस्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कार्यकाळ संपणाऱ्या दोन ...

जळगाव : मनपातील भाजपच्या चारपैकी दोन सदस्यांच्या जागेवर इतर दोन सदस्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कार्यकाळ संपणाऱ्या दोन सदस्यांच्या जागेवर इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपकडून चार सदस्यांपैकी कैलास सोनवणे व विशाल त्रिपाठी यांना कायम ठेवण्यात येणार असून, इतर राजेंद्र मराठे व महेश चौधरी यांच्या जागेवर इतरांना संधी दिली जाणार आहे.महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून काही फेरबदल करण्यात येणार आहेत. महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांना दिलेला कार्यकाळाची मुदत संपत आल्याने महिनाभरात महापालिकेत नवीन महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार असल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आधीच सांगितले आहे. आता स्विकृत सदस्यांपैकी दोन सदस्यांच्या जागेवर भाजपच्या इतर सदस्यांची वर्णी लागणार आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व घडामोडींना वेग येणार दिली आहे.दोन स्विकृत सदस्यांचा जागेवर नियुक्ती होणाºया इतर सदस्यांसाठी भाजपातील अंतर्गत गट सक्रीय झाले आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये अनेक गट-तट आहेत. त्यामुळे दोन सदस्यांच्या रिक्त होणाºया जागेवर आपल्याच गटातील व्यक्तीची वर्णी लागावी यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली जात आहे. अंतीम निर्णय गिरीश महाजन हेच घेणार असल्याची माहिती मिळाली.पाच नगरसेवकांबाबत मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर मनपा अधिनियम कलम १२ नुसार अपात्रतेची कारवाई करण्याची गरज होती. मात्र, दोन महिने होवूनही आयुक्तांनी कारवाई न केल्यामुळे आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी प्रधानसचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडे देखील तक्रार के ली आहे.‘त्या’ पाच नगरसेवकांच्या सुनावणीकडेही लक्षघरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान नगरसेवक भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे, कैलास सोनवणे यांना अपात्र का करण्यात येवू नये हा जाब विचारत मनपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच १७ डिसेंबर रोजी या सर्व नगरसेवकांची सुनावणी देखील घेण्यात येणार आहे. या सुनावणीनंतर या नगरसेवकांवर मनपाकडून अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनावणीकडेही लक्ष लागले आहे. पाच पैकी कैलास सोनवणे हे स्विकृत नगरसेवक आहेत. तर इतर चार सदस्य जनतेतून विजयी झाले आहेत. सोनवणेंवर कारवाई झाल्यास त्यांच्या जागेवरही भाजपला इतर सदस्याची नियुक्ती करावी लागणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव