भुसावळ : शहरातील गायत्रीनगरातील सुरेश इदासणीच्या घरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शनिवारी उद्ध्वस्त केल्यानंतर बनावट दारूचा पुरवठा करणा:यांसह ती विकत घेणा:यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आह़ेभुसावळात तब्बल पाच वर्षाच्या अंतराने तिस:यांदा बनावट दारूवर कारवाई झाल्याने या धंद्यातील मास्टर माईंडचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस प्रशासनावर आह़े मध्य प्रदेशातून शिरपूरमार्गे बनावट दारूसाठी लागणा:या स्पिरीटसह अन्य साहित्य उपलब्ध होत असल्याची माहिती आह़े कारवाईनंतर काही दिवस आरोपी आपला कारभार बंद करत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळणे कठीण होत आह़ेजंक्शनमध्ये बनावट मद्यनिर्मिती29 ऑगस्ट 2012 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सी़पी़निकम यांनी लाल जैन मंदिराजवळ सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकला होता, तर 10 सप्टेंबर 2015 रोजी वरील गुन्ह्यातील आरोपी अनिलकुमार उर्फ अन्नू कल्याणदास लेखवाणी (सिंधी कॉलनी, भुसावळ) यास देशी-विदेशीसह थेट सैन्याच्या जवानांना पुरवण्यात येणा:या दारूचे बनावट लेबल विक्री करताना अटक झाल्याने शहरात बनावट मद्याची निर्मिती होत असल्याच्या बाबीला पुष्टी मिळत़े मुख्य सूत्रधार मात्र नेहमीच मोकाट ठेवले जात असल्याचा आरोप आह़े
जंक्शन ठरतेय बनावट मद्यनिर्मितीचे केंद्र
By admin | Updated: June 19, 2017 01:14 IST