शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वासाने ‘सीए’ क्षेत्रात गगन भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:31 IST

नवप्रेरणा

जळगाव : डॉक्टर, अभियंता होण्यापेक्षा काही तरी वेगळे करण्याचा विचार करीत शिक्षण घेत असतानाच सीए व्हावे, असा निश्चय करीत आत्मविश्वास, चिकाटी या बळावर स्मिता बाफना यांनी हा निश्चय पूर्णदेखील केला आहे. विशेष म्हणजे केवळ सीए होऊन तेवढ्यावरच न थांबता त्यांनी सीए संघटनेचे विविध पद भूषवित आज अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळत आहे व एक महिलादेखील या क्षेत्रात गगण भरारी घेऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.स्मिता बाफना यांचे माहेर जळगावचेच. येथेच त्यांचे शिक्षण झाले. घरात वडिलदेखील सीए. विशेष म्हणजे वडील लग्नानंतर सीए झाले व त्यामुळे आपण इयत्ता चौथीत असतानाच सीए होण्याचे ठरविल्याचे स्मिता बाफना यांनी सांगितले. शाळेत असताना मैत्रिणी डॉक्टर, अभियंता होणार असल्याचे ठरवित होते. मात्र आपण यापेक्षा काही तरी वेगळे करायचे, असा विचार केला. त्यात वडिलांचा आदर्श डोळ््यासमोर होता. त्यानंतर तर इयत्ता दहावीमध्ये असताना ‘मेरी महत्त्वकांक्षा’ हा निबंध लिहिताना सीए होण्याची महत्त्वकांक्षा असल्याचे आपण त्यात लिहिल्याचे बाफना यांनी सांगितले. या स्पर्धेत आपल्याला पुरस्कारही मिळाला व ते एक प्रोत्साहन ठरले आणि सीएची वाटचाल सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. घरात तीनही बहिणीच असल्याने त्यामुळे अधिक जबाबदारी होती. ही जबाबदारी पेलण्याचे ठरविले आपण सीएचा टप्पा पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले.लग्नापूर्वीच सीए झालेल्या बाफना यांना जोडीदार मिळाले तेदेखील सीएच. त्यामुळे सासरीदेखील माहेरप्रमाणेच सीएचे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे सीएच्या कामात सातत्य राहत अखंडीतपणे हे काम सुरू ठेवत या क्षेत्रात बाफना यांनी एक वेगळा ठसा उमटविला.सीएचे काम करीत असताना सीए संघटनेचे सदस्यत्व त्यांना मिळाले. २०१६मध्ये त्या संघटनेच्या ‘स्टुडंट विंग’च्या अध्यक्षा झाल्या. हे काम करीत असताना त्यांनी या विंगच्या जळगाव शाखेला प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार मिळवून दिला. संघटनेतील कार्य पाहता त्यांची जबाबदारी वाढत गेली. २०१७मध्ये त्यांनी संघटनेच्या सचिव तर २०१८मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम संभाळले. त्या नंतर तर थेट संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली.आज ही जबाबदारी यशस्वीपणे संभाळण्यासह त्या गृहिणी म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडत आहे. मुलगा इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असून सीएचे काम करीत असताना मुलाच्या शिक्षणावरही लक्ष देत असल्याचे बाफना यांनी सांगितले. या सर्व कार्यासाठी आई, वडील, सासू-सासरे, पती, नणंद यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याचे बाफना यांचे म्हणणे आहे.प्रत्येक महिला ही सक्षम आहे. तिने ठरविले तर ती कोणत्याही क्षेत्रात झेप घेऊ शकते. स्वत:वर विश्वास ठेवा, कोणतेही काम अशक्य नाही. ‘हम किसीसे कम नही’ अशी भावना ठेवून मीदेखील आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली व या क्षेत्रात मी यशस्वी झाले.- स्मिता बाफना, अध्यक्षा, सीए असोसिएशन, जळगाव शाखा.

टॅग्स :Jalgaonजळगाव