शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणावातून जामनेरच्या पोलिसांना सुटकेचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:10 IST

सध्या पोलीस बांधवानी तणावमुक्तीसाठी जामनेरच्या वाकी रोडवर स्थापन पोलीस स्टेशनवर मोकळ्या जागेवर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे. फावल्या वेळात सकाळ-सायंकाळ येथील पोलीस कर्मचारी नित्यनेमाने व्हॉलिबॉल खेळ खेळताना दिसतात.

ठळक मुद्देफावल्या वेळेत खेळताहेत व्हॉलिबॉलतात्पुरते ग्राऊंड तयार करून रोज होतोय सराव

सय्यद लियाकतजामनेर, जि.जळगाव : दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्न, अपूर्ण मनुष्यबळ आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या यामुळे ५७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर जामनेर शहरासह तालुक्यातील ७९ गावांतील सुमारे दोन लाख नागरिकांची सुरक्षा अवलंबून आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पारदर्शक कारभार नव्या योजना, नवे रुप ही संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवत वाटचाल करीत असलेल्या येथील पोलीस ठाणे परिसरात तक्रारदांची वर्दळ असते. मात्र अपुºया संख्या बळामुळे जादा कामाने कर्मचाºयांचा मानसिक ताण वाढला आहे.ताण तणावपोलीस म्हणजे संरक्षण... पोलीस म्हणजे गुन्हेगारीवर नियंत्रण... पोलीस म्हणजे आरोप प्रत्यारोप..... पोलीस म्हणजे ताण तणाव ..... पोलीस म्हणजे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन... अन् पोलीस म्हणजे आॅन ड्युटी चोवीस तास...गुन्हे जास्त... गावे जास्त... लोकसंख्या जास्त... घात-अपघात जास्त... अन् पोलिसांची संख्या तुटपुंजी...ताण तणावात जीवन जगणाºया, पण जागल्याच्या भूमिकेत सेवाकार्य करणारी पोलीस यंत्रणा कायम आरोपींच्या पिंजºयात उभे असते.अशा या जनसेवक पोलिसांना कधीकधी आत्महत्या कराव्या लागल्याच्या दुर्घटनाही घडतात. कधीकधी वरिष्ठांवर तणावातून गोळ्या झाडल्याच्याही घटना घडल्या आहेत .अशा पोलिसांना कधीकधी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करावे लागते, तर तणावातून अनेकविध पोलिसांना हार्ट अ‍ॅटकही आले....तणाव मुक्तीसाठी व्हॉलिबॉलसध्या या पोलीस बांधवानी तणावमुक्तीसाठी जामनेरच्या वाकी रोडवर स्थापन पोलीस स्टेशनवर मोकळ्या जागेवर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे. फावल्या वेळात सकाळ-सायंकाळ येथील पोलीस कर्मचारी नित्यनेमाने व्हॉलिबॉल खेळ खेळताना दिसतात.पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांचे मार्गदर्शन व उपनिरीक्षक विकास पाटील यांच्या सहाकार्याने मोकळ्या पटांगणावर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे.नित्य कामकाज आटोपून येथील पोलीस कर्मचारी आता तणावमुक्तीचा एक मार्ग म्हणून सराव करतात.कोणत्याही परिस्थितीतून मानसिक व शारीरिक पातळीवर संयम व शांतीचा मार्ग म्हणून खेळाला महत्त्व आहेच. सोबत बरीच पोलिसांना आत्मिक बळही मिळते. काही तर सकाळ संध्याकाळ फिरणे पसंत करतात, तर काही मंडळी योगासने व प्राणायाम (योग) ही करतात.जामनेरच्या पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जामनेरच्या पोलिसांचा हाच कित्ता इतर सर्वच पोलीस बांधवांनी गिरवला तर नक्कीच मानसिक समाधान लाभेल !खेळ खेळल्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते आणि खिलाडू वृत्ती वाढते व शरीर काम करण्यास फिट राहते. खेळामुळे आजार लागत नाही.-डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, जामनेर 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यJamnerजामनेर