शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 15:33 IST

फैजपूर येथील खिरोदा रस्त्यावरील शेतात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारी धाड टाकत जुगारींकडून ६५३० रोख व मोबाइल, मोटारसायकल असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.

ठळक मुद्देअपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाकडून कारवाईसहा हजार रुपयांच्या रोकडसह ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्याततीन आरोपींना अटकदोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी

फैजपूर, जि.जळगाव : फैजपूर येथील खिरोदा रस्त्यावरील शेतात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारी धाड टाकत जुगारींकडून ६५३० रोख व मोबाइल, मोटारसायकल असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांंना मिळालेल्या गुप्त माहितीवरून रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पोलीस कर्मचारी रफिक शेख कालू, विजय नामदेव सोनवणे, सुनील दामोदरे, अजय पाटील या पथकाने खिरोदा रस्त्यावर चालणाºया जुगार अड्ड्यावर धाड घातली. यावेळी जुगार खेळणाºयांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यात जुगार खेळताना संदीप श्रावण चौधरी (रा.सावदा), इमाम गंभीर तडवी (रा.खिरोदा), नितीन जगन्नाथ चौधरी (रा.चिनावल) या तिघांना पोलिसांनी अटक केली, तर जुबेर नदीम शेख, मोसिन उर्फ लंगडा राजू हे पळून जाण्यात यशस्वी झाले.आरोपींकडून सहा हजार ५३० रुपये रोख व मोबाइल, मोटारसायकल असा एकूण ३८ हजार ९८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली किरण साठे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFaizpurफैजपूर