शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जगभरातील आईचं हृदय जाणून घेण्याचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:29 IST

जळगाव येथील उद्यमी महिला पतसंस्थेने ‘मदर्स आॅन व्हिल्स’ हा उपक्रम आयोजित केला होता. या अंतर्गत ६० दिवसात २० राष्ट्रांचा प्रवास करणाऱ्या माधवी सहस्त्रबुद्धे, उर्मिला जोशी व शीतल वैद्य-देशपांडे यांचे अनुभव कथनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानिमिताने या तिघींशी केलेल्या संवादाचा डॉ.मंजूषा पंकज पवनीकर यांनी ‘लोकमत’साठी लिहिलेला गोषवारा.

समविचारी मैत्रिणी एकत्र आल्या आणि जगभरातील आयांचे प्रश्न या ध्येयाने प्रेरित होऊन ठरविले जगप्रवास करण्याचे़ सुरू झाला २३ हजारांपेक्षा जास्त किलोमीटरचा २० राष्ट्रांमधील प्रवास. फाउंडेशन फॉर हॉलिस्टिक हेव्हलमेंट इन अ‍ॅकडेमिक फिल्ड (एफएचडीएएफ) या संस्थेने ‘मदर आॅन व्हिल’ हा उपक्रम नुकताच पूर्ण केला़ संस्थेच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे (दिल्ली) यांच्या संपूर्ण जगातील आईच्या समस्या जाणून घेणे या मुख्य उद्देशासाठी सुरू झाला ‘मदर्स आॅन व्हिल्स’चा प्रवास़ दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज्य यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाचे उद्घाटन झाले़ २० राष्ट्रातून प्रवास करीत लंडन इथे या प्रवासाचा समारोप झाला़आईला समजून घेण्यासाठी प्रवासमाधुरी सहस्त्रबुद्धे (दिल्ली), उर्मिला जोशी व शीतल देशपांडे (पुणे) आणि माधवीसिंग तोमर (ग्वाल्हेर) या चार समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन ठरविले जगभरातील आईची भूमिका जाणून घ्यायची. अ़भा़वि़प़च्या कार्यकर्त्या असल्याने सामाजिक कार्याची चौघींना आवड होती़ माधुरीताई नोकरीनिमित्त भारतातील पूर्वांचल भागात बरेच वर्षे होत्या. या काळात पूर्वांचलातून शिक्षणानिमित्त बाहेर पडलेल्या मुला-मुलींवर बºयाच ठिकाणी हल्ले झाले होते़ त्यामुळे पूर्र्वांंचलात इतर राज्यातील लोकांविषयी संताप होता. आपण भारतीय नाही, अशी मानसिकता महिलांची व नागरिकांची होती़ त्यानंतर माधुरीताई दिल्लीला आल्या व काही वर्षांनी परत पूर्वांचलात गेल्या. त्यावेळी पूर्र्वांंचल भागात बºयापैकी शांतता जाणवली. तेथील महिलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन दिसला. साहजिकच समकालीन पिढीतही तो जाणवला. त्याचवेळी त्या काश्मीरमध्येही गेल्या़ तेथील चित्र पूर्णपणे वेगळे होते़ घुसखोरीमुळे तेथील वातावरण बिघडले़ महिलांना स्वातंत्र्य नसल्याने साहजिकच मुलांवर संस्कार नव्हते़ दोन्ही ठिकाणच्या आयांची मानसिकता लक्षात घेता आईच्या भूमिकेवरच त्या त्या पिढीचे भवितव्य अवलंबून असते हे लक्षात आले़ मग आपण जगभरातील आयांची काय मानसिकता असेल याची उत्सुकता लागली़ माधुरीतार्इंनी आपल्या तिन्ही मैत्रिणींना जगप्रवासाची कल्पना सांगितली़दोन वर्षांपासून पूर्वनियोजन व प्रत्यक्ष प्रवासजवळ जवळ २४ हजारांवर किलोमीटरचा प्रवास असल्याने सर्व गोष्टीचे पूर्वनियोजन करण्यासाठी दोन वर्षांपासून चौघींनी तयारी सुरू केली होती़ इंटरनेटच्या सहकार्याने ज्या ज्या देशात जायचे तेथील रस्त्यांचा अभ्यास केला़ प्रत्येक दिवसाचे नियोजन केले़ मुक्कामासाठी हॉटेल्स बुकिंग केले़ बºयाच देशांचा व्हिसा काढावा लागला. काही देशांमध्ये व्हिसाची गरज भासली नाही़ सोबत गाईड नव्हता. त्यामुळे पूर्वतयारीवरच त्यांनी भर दिला़ एका कंपनीने त्यांना कार दिली होती़ याव्यतिरिक्त विविध संस्थांनी आर्थिक मदत केली. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या नेटवर्कचा त्यांना खूप उपयोग झाला़ प्रत्यक्ष प्रवासात त्यांना किरकोळ वगळता मोठी अडचण आली नाही़ गाईड नसल्याने भाषेचा प्रश्न होता.परंतु साईन लँग्वेज आणि हावभाव याद्वारे हा प्रश्न सुटला. माधवीतार्इंनी याबाबत समर्पक उत्तर दिले. ते म्हणजे आईचे हृदय असल्याने सर्वांनीच आम्हाला समजून घेतले़ रात्री प्रवास करायचा नाही हे त्यांनी ठरविले होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून प्रवासाला सुरुवात करणे. त्या त्या देशात गेल्यावर स्थानिक मातांची मिटिंग घेणे. ही मिटिंग कधी दोन तास तर कधी पाच तास चालायची. चौघी शाकाहारी असल्याने पॅक फूड सोबत होेते. पण ते खाणे व रात्री हॉटेलमध्ये मुक्काम असा दिनक्रम त्यांचा होता़ साठ दिवसांच्या प्रवासात ३०च्या वर मिटिंग त्यांनी घेतल्या. बाकीच्या दिवसात प्रेक्षणीय ठिकाणे पाहिलीत़ तिबेटमध्ये अतिशय दुर्गम भागातून त्यांनी प्रवास केला. कदाचित त्या प्रवास करणाºया पहिल्या भारतीय असतील़जगभरातील आईची मानसिकताभारतीय व इतर देशातील आई यांच्या मानसिकतेत फारसा फरक त्यांना वाटला नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतीय आई आणि मुले सुरक्षित वातावरणात असतात़ कौटुंबिक जबाबदाºया, मुलांचे संगोपन, पुरुषप्रधान संस्कृती हे समान मुद्दे होते. माधवीताई व शीतलताई यांच्या सांगण्यानुसार- १. स्वत:ची १४-१५ वर्षांची मुले तेथील पालकांना ओझे वाटतात़ २. तेथे नीतीमत्ता किंवा संस्काराचा अभाव जाणवला. एका मुलाला त्याच्या पालकांविषयी प्रश्न विचारला. त्याने दिलेले उत्तर धक्कादायक होते़ माझे वडील माझ्या कितव्या आईसोबत रहात आहेत व आई कोणत्या वडिलांसोबत आहे याची मला माहिती नाही़ ३. वेगवेगळया प्रकारचे नाजूक प्रश्न या चौघींना जाणवले़ ४. भारतीय महिलांना एकत्र कुटुंबामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पाठिंबा असतो़५. बाहेरच्या देशात महिलांना स्वबळावरच सर्व करावे लागते़ यामुळे तेथील महिला प्रचंड तणावात वावरताना दिसल्या़ याबाबत उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चौघींनी केला़१. कुटुंब व्यवस्थेचे पुनरुत्थान करणे गरजेचे आहे़ २. महिलांनी आईची भूमिका नैसर्गिकरीत्या समजून घेणे आवश्यक आहे़ ३. करिअर व मुले यांच्यात समतोल राखणे गरजेचे आहे़ ४. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे़या प्रवासामुळे तुम्हाला काय फायदा झाला असे विचारल्यावर तिघींनीही सांगितले, ‘जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोण बदलला़ देशा-देशात जो काही तणाव आहे तो केवळ राजकीय प्रश्नांमुळे आहे़ सर्वसामान्य लोकांना त्यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही, असा अनुभव त्यांनी सांगितला़ या उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे नोव्हेंबरमध्ये सर्व आयांचे संमेलन एफएचडीएएफमार्फत आयोजित करण्यात येणार आहे़ यात प्रवास केलेल्या २० राष्ट्रांमधील ३ महिला आमंत्रित केल्या जाणार आहे़ त्याचप्रमाणे भविष्यात दक्षिण आशिया राष्ट्रांमध्ये प्रवास करण्याचा मानस तिघींनी बोलून दाखविला़- डॉ.मंजूषा पंकज पवनीकर, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव