शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात प्रवास झाला सुखकर; रेल्वे प्रवाशांची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:06 IST

रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रवासाची कसून तपासणी करण्यात येत आहे.

वासेफ पटेलभुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रवासाची कसून तपासणी करण्यात येत आहे. थर्मल स्क्रीनिंग, सामानाचे निर्जंतुकीकरण यास प्रवाशांचे स्थानिक व ज्या गावी जाणार आहे त्या पत्त्याची नोंद करण्यात येत आहे. फक्त आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवाशांसाठी परवानगी देण्यात येत असून खऱ्या अर्थाने प्रवास आता अनुभवास येत आहे. गाडीमध्ये गर्दी नसल्याने प्रवाशांचा सुखकर प्रवास होत आहे.कोरोना संसर्ग वाढू नये याकरिता भुसावळरेल्वे स्थानकावरील दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. ज्या प्रवाशानजवळ कन्फर्म (आरक्षित) तिकीट असतील अशा प्रवाशांना प्रवाशांची मुभा आहे. प्रवेशद्वारावरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रत्येक प्रवाशाची थर्मल क्लिनिंग केली जात आहे. प्रवाशांची स्थानिक व ज्या गावी जाणार आहे त्या पत्त्याची नोंद करण्यात येत असून कोणत्या गाडीत, कोणत्या सीटवरून प्रवास करणार आहे याची अचूक माहितीही नोंद करण्यात येत आहे. तसेच फलाटावर दाखल होण्यापूर्वी प्रवाशांसोबत असलेल्या सामानाचे मशीनद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.भुसावळवरून धावतात ४४ गाड्याभुसावळ रेल्वे स्थानकावरून कोरोना काळामध्ये अपडाऊनच्या दिशेने तब्बल ४४ गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. भुसावळ जंक्शनचे ठिकाण असल्यामुळे याठिकाणी गाड्यांचा जास्त वेळ थांबा आहे. या ठिकाणी स्वच्छता सॅनिटायझेशन, प्रसाधनगृहासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येते.प्रवास सुखकरकोरोना पूर्वी रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे बाजाराचे स्वरूप प्राप्त होत असे. वेटिंग, कन्फर्म, जनरल तिकीटधारकांना प्रवेश असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत होती व अनेक वेळा फक्त गाडीत बसून कसा तरी प्रवास करून जाण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. खºया अर्थाने प्रवास काय हे आता कोरोना काळात दिसून येत आहे. फक्त ज्या प्रवाशांचे कन्फर्म तिकीट असतील अशा प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत असून, गाडीमध्ये एकाही वेटिंग तिकीटला परवानगी नाही. जो-तो आपापल्या सीटवर सुखकर प्रवास करीत आहे. असेच नियम कोरोनानंतरही रेल्वे प्रशासनातर्फे बंधनकारक करावे. अर्थातच फक्त कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशा पद्धतीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सातत्याने होते उद्घोषणारेल्वेस्थानकावर कोरोनाच्या गाईडलाईननुसार प्रवाशांनी सतर्क रहावे. काळजी घ्यावी याकरिता मास्क वापरावे. वेळोवेळी हात धुवावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. नको त्या ठिकाणी स्पर्श करू नय.े याशिवाय इतर कोरोना संबंधित गाईडलाईनच्या वेळोवेळी रेल्वेस्थानकावरून घोषणा करण्यात येत आहे.रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची कोरोनापासून बचाव व्हावा याकरिता विशेष काळजी घेतली जात आहे. प्रत्येक प्रवाशाची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे. थर्मल स्क्रीनिंग, सामान निर्जंतुकीकरण, याशिवाय गाडीत प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून प्रवास करण्यावर भर देण्यात येत आहे.-युवराज पाटील, सीनियर डीसीएम, भुसावळ विभाग

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ