शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातून जितेंद्र पाटीलने पहिल्यांदा उघडले रणजी संघाचे दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:13 IST

डावखुरा मध्यमगती गोलंदाज दुखापतीतून सावरत पुनरागमनाच्या प्रय}ात

ठळक मुद्देजितेंद्रपाठोपाठ आता जळगावच्या जगदीश झोपेला रणजी सामन्याची संधी जितेंद्रने महाराष्ट्रासाठी 2010-11 च्या दोन रणजी सामन्यात 39 धावा केल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - पाचोरा येथील जितेंद्र अरुण पाटील हा जळगाव जिल्ह्यातील पहिला रणजी क्रिकेटपटू असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने रणजी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन सामन्यात प्रतिनिधित्व करण्यासोबतच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.  भुसावळ येथे मध्य रेल्वेच्या सेवेत असलेला हा 28 वर्षीय खेळाडू सध्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर असला तरी आपण आता  पुनरागमनाच्या प्रय}ात आहोत असे त्याने लोकमतशी बोलताना सांगितले.28 वर्षीय जितेंद्रपाठोपाठ आता जळगावच्या जगदीश झोपेला रणजी सामन्याची संधी मिळाली आहे.

उजव्या हाताने फलंदाजी व डावखूरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या जितेंद्रने महाराष्ट्रासाठी 2010-11 च्या दोन रणजी सामन्यात 39 धावा केल्या असून गोलंदाजीत 254 धावात 7 बळी मिळवले आहेत. यात उत्तर प्रदेशविरुध्द तीन आणि दिल्लीविरुध्दच्या चार बळींचा समावेश आहे. दिल्लीविरुध्दचे 113 धावातील चार बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे.

जितेंद्रला 2010-11 मध्ये प्रत्यक्ष प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले असले तरी 2006-07मध्येही अवघ्या 17 वर्षे वयात त्याची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली होती.

आयपीएलच्या 2009 च्या सत्रात रॉयल च?लेंजर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द त्याला संधी दिली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा खेळली गेली होती. यानिमित्ताने अनिल कुंबळे, राहुल द्रविड, विराट कोहली, मार्क बौचर, नेथन ब्रेकन, केदार जाधव, जेकस् कॅलिस, ख्रिस गेल अशा नामवंत खेळाडूंसोबत राहण्याची संधी त्याला मिळाली होती.

2009 मध्ये अभिनव मुकुंद व,भुवनेश्वर कुमार यांच्यासोबत त्याची प्रतिष्ठेच्या बोर्डर- गावस्कर शिष्यवृत्तीसाठीसुध्दा निवड झाली होती. मात्र नंतर दुखापतींनी त्याच्या बहरणा:या कारकिर्दीला ब्रेक लावला परंतु आपण आता त्यातून बाहेर आलो असून पुनरागमनाच्या प्रय}ात असल्याचे त्याने सांगितले.