शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

झुक झुक गाडी की सिटी आवाज लगाये रे..., घर आजा परदेशी तेरा देश बुलाए रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 20:59 IST

१ जूनपासून १९ रेल्वे धावणार आहेत.

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या अडीच महिन्यापासून प्रवासी रेल्वे बंद करण्यात आली होती. मात्र १ जूनपासून नियम, अटीसह भुसावळ विभागातून १९ गाड्या धावणार आहेत.कधी नव्हे रेल्वेच्या इतिहासात रेल्वे गाड्या बंद झाल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच महिन्यापासून सर्व प्रवासी गाड्या रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनासोबत जनजीवन पूर्ववत व्हावे याकरिता नियम अटीसह भुसावळ विभागातून १९ गाड्या धावणार आहेत.या गाड्या धावतील भुसावळ रेल्वे विभागातूनगाडी क्रमांक ०१०१५/१६, अप- डाउन गोरखपुर लोकमान्य तिलक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०१०६१/६२ अप- डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०१०७१/७२ अप -डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०१०९३/९४ अप- डाउन मुंबई वाराणसी महानगरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०२५३३/३४ अप -डाउन मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस,गाडी क्रमांक ०२६१७/१८ अप-डाउन हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०२६२९/३०अप -डाउन न्यू दिल्ली यशवंतपूर कर्नाटका संपर्क क्रांति एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०२७१५/१६ अप -डाउन नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०२८१०/०९ अप -डाउन हावडा-मुंबई मेल,गाडी क्रमांक ०२८३३/३४अप -डाऊन अहमदाबाद हावडा एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०९०४५/४६ अप -डाउन सुरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०३२०१/०२अप-डाउन पटना लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०२१४१/४२ अप- डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०२४४१/४२ अप-डाउन गोरखपूर लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस,गाडी क्रमांक ०२१४९/५० अप-डाऊन पुणे दानापूर एक्सप्रेस गाडी क्रमांक ०५६४५/४६ अप-डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस गोवाहाटी एक्सप्रेस,गाड़ी क्रमांक झ्र०९०९०/८९ अप -डाऊन अहमदाबाद मुजफ्फरपूर एक्सप्रेस व्हाया सुरत, गाड़ी क्रमांक झ्र ०९०८४/८३अप -डाऊन अहमदाबाद ते गोरखपूर एक्सप्रेस वाया सुरत,गाडी क्रमांक ०२७७९/८०अप -डाऊन वास्को दि गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस.या गाड्या अप-डाऊन दिशेने एक जूनपासून धावणार आहे.असे असतील नियम व अटीजाणाऱ्या प्रवाशांजवळ कन्फर्म तिकीट आवश्यक आहे, अन्यथा रेल्वेस्थानकावर परवानगी देण्यात येणार नाही. प्रत्येक प्रवाशाकडे मोबाईलमध्ये आरोग्य सेतू एप्स डाउनलोड असणे आवश्यक आहे.प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर गाडीच्या वेळेच्याआधी दीड तास आधी रेल्वेस्थानकावर यावे, जेणेकरून प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यास सोयीस्कर होईल. एखाद्या प्रवास्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यास, ताप निदर्शनास आल्यास प्रवाश्यांची यात्रा रद्द करण्यात येईल व प्रवाशांना पूर्ण रक्कम परत करण्यात येईल.एसी कोचमध्ये खिडक्यांना पडदे लावण्यात येणार नाही. तसेच उशीसुद्धा दिली जाणार नाही. प्रवाशांनी प्रवासात सोबत स्वतःचे अन्न सामुग्री, जेवण, पाणी वगैरे सोबत घ्यावे. तसे आयआरसीटीसीद्वारा पॅन्ट्री कार असलेल्या गाड्यांमध्ये जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. रेल्वेस्थानकावर खान पान स्टॉल उघडे राहतील. यावेळेस शारीरिक अंतर ठेवणे गरजेचे आहे.प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही.विशेष गाड्यांच्या धनवापसीचे नियम पूर्वीसारखेच राहतील. प्रवास करताना कमीत कमी सामान घेऊन जावे.प्रवाशांनी राज्य सरकार तथा रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ