शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भूल दिनानिमित्त जळगावात सोमवारी ‘जीवन संजीवन प्रात्यक्षिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:50 IST

आगळ्य़ा-वेगळ्य़ा पद्धतीने साजरा करणार दिन

ठळक मुद्देसामान्यांना उपयोगी पडेल व जीवदान ठरू शकेल असा उपक्रमपहिल्या पाच मिनिटात मदत मिळणे गरजेचे जीवन संजीवनी क्रियेबद्दल डॉक्टरांमार्फत  माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15- जागतिक भूल दिनानिमित्त इंडियन सोसायटी ऑफ अॅनॅस्टेशीयालॉजिस्ट (आयएसए) शाखेतर्फे 16 रोजी  भाऊंचे उद्यान येथे  सकाळी 7 वाजता ‘जीवन संजीवन प्रात्यक्षिक’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात रविवारी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या वेळी आयएसए संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील, सचिव डॉ. लीना पाटील, डॉ. अभिनय हरणखेडकर, डॉ. अश्विनी टेणी, डॉ. धीरज चौधरी आदी उपस्थित होते. 

आगळ्य़ा-वेगळ्य़ा पद्धतीने साजरा करणार दिन16 ऑक्टोबर जागतिक भूलदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा यानिमित्त सामान्यांना उपयोगी पडेल व जीवदान ठरू शकेल, असा उपक्रम राबविण्याचा निश्चय  इंडियन सोसायटी ऑफ अॅनॅस्टेशीयालॉजिस्ट शाखेने केला. त्यानुसार जिल्ह्यात प्रथमच जीवन संजीवनी प्रात्यक्षिक हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

काय आहे जीवन संजीवनीअचानकपणे कोणी कोठेही कोसळले आणि त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडले तर अशा व्यक्तीला पहिल्या पाच मिनिटात मदत मिळणे गरजेचे असते. यासाठी त्याला त्याच वेळी प्राथमिक उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळू शकते. यालाच जीवन संजीवन असे संबोधले जाते. या   विषयीचे  प्रात्यक्षिक 16 रोजी सादर करण्यात येऊन या जीवन संजीवनी क्रियेबद्दल डॉक्टरांमार्फत  माहिती दिली जाईल व  जनजागृती करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अवयवदानाविषयी करणार जनजागृतीसमाजात अवयवदानाचे महत्त्व वाढावे व त्या विषयी जनजागृती व्हावी, या संदर्भात इंडियन सोसायटी ऑफ क्रीटिकल केअर मेडिसीन व इंडियन सोसायटी ऑफ अॅनॅस्टेशीयालॉजिस्ट (आयएसए) यांची बैठक झाली.  वर्षभर राबविण्यात येणा:या समाजोपयोगी उपक्रमाचाच एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये अववयदानाची प्रथम डॉक्टरांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून त्यानंतर नागरिकांर्पयत हा संदेश पोहचविला जाणार आहे.  या वेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आयएमएचे सचिव डॉ. राजेश पाटील, डॉ. राजेश डाबी, डॉ. अरुण पाटील, डॉ. लीना पाटील, डॉ. संजय उंबरकर आदी उपस्थित होते.