शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़ शिक्षण विभागालाच अभ्यासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:24 IST

घोळ समोर येत असताना बदल्यांच्या पारदर्शकतेचा गवगवा कशासाठी

आनंद सुरवाडेजळगाव : जिल्हाभरात प्राथमिक शिक्षणाचा कसा बोजवारा उडाला आहे याची असंख्य उदाहरणे गेल्या आठ दिवसातच समोर आलेली आहेत़ अगदी शाळा खोल्यांच्या गंभीर प्रश्नापासून ते थेट वर्गाला शिक्षकच नसल्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे़ शिक्षकांचीच संख्याच कमी आहे, असे सांगत शिक्षण विभाग हात वर करून सर्व जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे़ जामनेर तालुक्यातील ढालगावच्या प्रकरणाने शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडेच काढले आहे़जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दोन महिने शिक्षणाधिकारीच नव्हते़ कसेबसा उपशिक्षणाधिकारी डिगंबर देवांग यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला़ त्यामुळे शाळा सुरू झाल्या त्या शिक्षणाधिकारी नसताना़ अशातच जिल्हा परिषदेत सहा ते आठ वर्षांनी शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली़ त्यानंतर बदली प्रक्रिया पार पडली़ ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने झाल्यामुळे अत्यंत पारदर्शकपणे झाल्याचा दावा प्रशासन करते़ मात्र, त्यानंतर समोर येणाऱ्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा समोर येणारा गंभीर प्रश्न, होणोारे आरोप- प्रत्यारोप, राजकीय लोकप्रतिनिधींचा बदली प्रक्रियेतील सहभाग, आपल्याला या प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याचे सांगत नाराज झालेले शिक्षण सभापती हे सर्व प्रकार प्रशासनाचे हे सर्व दावे फोल ठरवते़ नशिराबादच्या शाळेत १३६ हून अधिक विद्यार्थी संख्या असतानाही एका शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांची बदली करण्यात येते़ ढालगाव येथील उर्दू शाळेचे तीन शिक्षक बदलून येथे दोन शिक्षक दिले़ ते रूजू व्हायला तयार नाहीत़ शिक्षक आणि प्रशासनाच्या हेव्या दाव्यांमध्ये विद्यार्थ्यांचे जे भविष्य खराब होत आहे त्यास जबाबदार कोण यात विद्यार्थी पालकांचा काय दोष़़़़ लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या विषयाकडे अक्ष्यम दुर्लक्ष केलेले आहे़ याची प्रचिती जिल्हा परिषदेतच आली़ पाच पैकी केवळ दोनच सदस्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, अनेकांनी केवळ बाजूने निसटून जाण्यात धन्यता मानली़ अधिकाऱ्यांना खाली यायला तीन तास लागले़ जर आपण आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे भविष्य म्हणत असू, त्यांच्या शिक्षणासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठ मोठ्या निधीच्या घोषणा केल्या जात असतील, कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे वांरवार नुसते सांगितलेच जात असेल, आणि जर या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही राजकीय, प्रशासकीय मंडळी केवळ 'शाळा'च भरवत असतील तर हे भविष्य अंधारात आहे़़़़़ हे सांगायला भविष्यकाराची गरज नाही़

टॅग्स :Jalgaonजळगाव