कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथे सैन्य दलातील जवांनाच्या वतीने व खान्देश रक्षक ग्रुपच्या माध्यमातून कजगाव व परिसरातील गरीब नागरिकांना साडी व किराणा वस्तू भेट म्हणून देण्याचा उपक्रम सीमेवर रक्षण करणाऱ्या कजगाव येथील जवानांच्या वतीने घेण्यात आला.परिसरातील गरीब नागरिकांना जवांनानी किराणा साहित्यासह विविध भेट वस्तू दिल्या आहेत. देशाची सेवा करता करता गावाचीही सेवा करावी, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला असल्याचे जवानांनी यावेळी बोलून दाखविले.यावेळी रवींद्र वाघ, दत्तात्रय महाजन, हर्षदीप महाजन, दत्तू महाजन, हर्षल महाजन, मयूर महाजन, किरण राजपूत, विशाल सोनवणे, राहुल कोष्टी, शुभम राजपूत, भगवान भोई, विजय मोरे व सैन्य दलातील जवान तसेच परिसरातील तरुण उपस्थित होते.
कजगाव येथे जवानांनी दिला गरिबांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:56 IST
सैन्य दलातील जवांनाच्या वतीने व खान्देश रक्षक ग्रुपच्या माध्यमातून कजगाव व परिसरातील गरीब नागरिकांना साडी व किराणा वस्तू भेट म्हणून देण्याचा उपक्रम सीमेवर रक्षण करणाऱ्या कजगाव येथील जवानांच्या वतीने घेण्यात आला.
कजगाव येथे जवानांनी दिला गरिबांना आधार
ठळक मुद्देजवानांच्या उपक्रमांचे परिसरात कौतुकदेशाच्या सेवेसोबतच गरिबांनाही हातभार लावण्याचा संकल्पजवानांसोबतच इतरांचीही उपस्थिती