धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीवर कॉँग्रेस प्रणीत जवाहर शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व कायम ठेवत 18 पैकी 15 जागा पटकावल्या. विरोधी सर्वपक्षीय शेतकरी प्रगती पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या. शेतकरी प्रगती पॅनलचे प्रा.अरविंद जाधव हे 25 मतांनी पराभूत झाले. माजी मंत्री रोहिदास पाटील व आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर गटाने या निवडणुका लढविल्या. विजयी उमेदवारांमध्ये पॅनलप्रमुख सुभाष देवरे, व्यापारी मतदारसंघातून प्रमोद जैन, विजय चिंचोले, विजय गजानन पाटील यांचा समावेश आहे. विरोधी गटात भाजपचे मनोहर भदाणे, प्रा.अरविंद जाधव, शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी प्रगती पॅनलला तीन जागा मिळाल्या. त्यांच्या पॅनलचे मनोहर भदाणे, किरण गुलाबराव पाटील आणि गंगाराम कोळेकर फक्त हे तीनच उमेदवार विजयी झाले आहेत. अरविंद जाधव पराभूत सोसायटी मतदारसंघातून शेतकरी प्रगती पॅनलच्या प्रमुखांपैकी प्रा.अरविंद जाधव हे पराभूत झाले. परंतु मतांचे अंतर कमी असल्याने त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे पुन्हा मतमोजणी करण्यात आली. त्यातही निकाल तोच कायम राहिला. पण या फेरमतमोजणीमुळे शेवटचा निकाल जाहीर होण्यासाठी सायंकाळचे पाच वाजले.
धुळे बाजार समितीवर ‘जवाहर’चे वर्चस्व कायम
By admin | Updated: December 8, 2015 00:30 IST