शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

साधू ओळखावा मरणी.., जानवे ग्रामस्थांनी काढली हभप दगडू बोरसे यांची ‘आनंदयात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 12:26 IST

अलौकीक भाग्य

ठळक मुद्देआठवणींना  उजाळा गावातील लोकांनी वर्गणी करीत हा खर्च करण्याचा निर्णय

चुडामण बोरसे / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27-  वीर ओळखावा रणांगणी , साधू ओळखावा मरणी.. आणि कर्ता ओळखावा कर्मकरणी.. संत नामदेव महाराजांच्या याच संतवचनाचा अनुभव जानवे ता. अमळनेर येथे दगडू बोरसे यांच्या अंत्ययात्रेत अनुभवास आला. गावातील लोकांनी अंत्ययात्रेसाठी वर्गणी गोळा केली आणि फटाके फोडून वाजत- गाजत अंत्ययात्रा नव्हे तर आनंदयात्रा काढत..बहिराम महाराजांच्या या भक्ताला अखेरचा निरोप दिला.    जानवे गावात एवढ्या  प्रचंड प्रमाणात निघालेली ही पहिलीच अंत्ययात्रा होती.. असे अलौकीक भाग्य कमी लोकांच्या नशिबी येत असते.. हभप दगडू शंकर बोरसे (65) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे जाणे सर्वांनाच चटका लावून गेले.  गावातील एक चालते- बोलते व्यक्तीमत्व. कुणाच्याही मदतीला धावून जाणारे.. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो त्यात दगडू बोरसे नाहीत, असे होणार नाही. वयाच्या 20 व्या वषार्पासून ते पंढरपूरची पायी दिंडी करीत आले. अनेक आजारांवर ते  लोकांना औषधी देत असत.. घरी आर्थिक स्थिती जेमतेम..सलूनचा व्यवसाय करीत पण कुणाकडून कधीच अपेक्षा  केली नाही. विठ्ठल मंदिर उभारणीत त्यांचा पुढाकार होता. या निस्वार्थ भावनेमुळे जानवे आणि परिसरात दगा नाना म्हणून त्यांना ओळख मिळाली. गेल्या काही वषार्पूर्वी तत्कालीन सरपंच शिवाजीराव पाटील यांनी गावासाठी प्रवेशद्वार बनविले.  सरपंचांनी दगडू बोरसे यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचे लोकार्पण केले होते, या आठवणींना  उजाळा मिळाला.   रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील लोकांनी वर्गणी करीत हा खर्च करण्याचा निर्णय घेतला.. बघता बघता बरीच रक्कम जमा झाली.  अंत्ययात्रेच्यावेळी गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सारा गाव त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. फटाके फोडून आणि वाजत- गाजत त्यांची अंत्ययात्रा निघाली. ठिकठिकाणी महिलांनी या हरिच्या सेवकाची आरती केली. बहिरम महाराज की जय आणि दगा नाना की जय.. च्या घोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ सोमवार 22 पासून गावातील विठ्ठल मंदिराच्या आवारात दहा दिवस कीर्तन सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.