शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेत सरसकट सर्वांना मिळेल आरोग्य सेवा -डॉ़ गोपाल जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:53 IST

तक्रार असल्यास आरोग्य मित्रांना सांगा

आनंद सुरवाडे जळगाव : जिल्हा रुग्णालय कोविड केल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याने डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयही काही प्रमाणात कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आले़ अशा स्थितीत जिल्ह्यातील ३३ रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरसकट मोफत उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे़ सद्यस्थितीत अडचणी नाहीत, मात्र, रुग्णांना तरीही काही अडचणी असल्यास आरोग्य मित्रांना भेटा, तक्रार करा तात्काळ त्याचे निरसन होईल, अशी माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ़ गोपाल जोशी यांनी दिली़जिल्ह्यातील सरसकरट सर्वांना या योजनेत खासगी रुग्णालयात विविध आजारांच्या उपचाराची सेवा मोफत उपलब्ध आहे़ याविषयी त्यांनी लोकमत विशेष मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.प्रश्न : महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेची जिल्ह्यातील सद्यस्थिती काय?डॉ़ जोशी : जिल्ह्यातील ३४ रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत़ त्यापैकी पाच शासकीय असून २९ रुग्णालये ही खासगी आहेत़ त्यात कोविडचे रुग्ण वाढल्यामुळे काही खासगी रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आली आहेत. त्यात गणपती हॉस्पीटलचा समावेश आहे. गोदावरी रुग्णालयाचे ४०० बेड कोविडसाठी राखीव आहेत तर ३५० बेड हे योजनेतील रूग्णांवर उपचारसाठी आहेत़ शिवाय जिल्हा रुग्णालय पूर्णत: कोविड आहे़प्रश्न : या योजनेत नेमके बदल काय झाले आहेत?डॉ़ जोशी : या योजनेत आता प्रामुख्याने एक बदल म्हणजे तुमच्याकडे कोणतीही शिधापत्रिका असो. ती पांढरी असो वा केसरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. जरी तुमच्याकडे शिधापत्रिका नसली तरी तहसीलदारांच्या पत्रानुसार तुम्हाला या योजनेतील रुग्णालयात उपचाराची सेवा मिळणार आहे़ यात १२० आजार असे आहेत जे आधी केवळ शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचारांची परवानगी होती. या योजनेअंतर्गत, मात्र, आता या १२० आजारांवर खासगीतही उपचाराची परवानगी देण्यात आली आहे़ या व्यतीरिक्त प्रमुख बदल म्हणजे प्रसुती किंवा सिझेरीयन या योजनेत समाविष्ट कधीच नव्हते, यासारखे ६७ आजार ३१ जुलैपर्यंत या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.उपचार न मिळाल्यास नागरिकांनी काय करावे?डॉ़ जोशी : जे ९९६ व नवीन ६७ असे आजार योजनेत समाविष्ट आहेत ते जर योजनेच्या रुग्णालयात मिळत नसतील तर अशा प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे़ रुग्णांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधावा, किंवा टोल फ्रि क्रमांकावर कळवावे, आमच्याकडून तातडीने शंकाचे निरसन केले जाते़ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी तीन वेळा खासगी डॉक्टर्ससोबत बैठक घेतलेली आहे़ प्रत्येक रुग्णाला उपचार मिळालाच पाहिजे, रुग्ण नाकारू नका अशा सक्त सूचना त्यांनी दिलेल्या आहेत़ त्यामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व सर्वांना आरोग्य सेवा पूर्ण व वेळेवर मिळण्यासाठी यंत्रणा तत्पर आहे़जिल्ह्यातील सरसकरट सर्वांना या योजनेत खासगी रुग्णालयात विविध आजारांच्या उपचाराची सेवा मोफत उपलब्ध आहे़ जिल्ह्यात यासाठी ३३ खाजगी रुग्णालयात या उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.पांढरी अथवा केसरी असली तरी योजनेचा लाभ घेता येईल. शिधापत्रिका नसली तरी तहसीलदारांच्या पत्रानुसार या योजनेतील रुग्णालयात उपचाराची सेवा मिळणार आहे़-डॉ़ गोपाल जोशी, जिल्हा समन्वयक, म.फुले जनआरोग्य योजना

टॅग्स :Jalgaonजळगाव