आॅनलाईन लोकमतजामनेर, दि. २८ : शहरातील मदनी नगर या प्रतिष्ठित भागात राहणाºया शेख सांडू शेख रहेमान यांचे संपूर्ण कुटुंब सामाजिक बांधिलकी जपत आहे. होळी व त्यानंतर येणाºया गुढीपाडवा या सणासाठी हार कंगनसह गोड खाद्यपदार्थ बनविण्यात व्यस्त आहेत. गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेल्या या व्यवसायाने या कुटुंबाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली मात्र चरितार्थ चालविण्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून दिला आहे.मराठी माणसाच्या नववर्षांची सुरुवात ही गुढीपाडव्याने होत असते. घरासमोर बांधण्यात येणाºया गुढीला हार आणि कंगन चढविण्यात येत असते. गेल्या ४० वर्षांपासून जामनेर शहरातील शेख सांडू हे हा व्यवसाय करीत आहेत. वडिलोपार्जित असलेल्या या व्यवसायामुळे शेख यांनी या व्यवसायात चांगला जम बसवला आहे. कुटुंबातील सर्वच कुटुंब सदस्य हातभर लावत आहे.अशी आहे हार कंगन बनविण्याची प्रकिक्रयासकाळी उठून साखर व त्यांच्या पासुन तयार होणाºया शर्करापाक वर तुरटी प्रक्रिया करण्यात येते. शुद्धीकरण करून विशिष्ट आकाराच्या साच्यांमध्ये हा पाक ओतला जातो. काही वेळे हा साचा तसाच ठेवण्यात येऊन शर्करा पाक घट्ट झाल्यानंतर तो काढण्यात येतो.प्रत्येक वर्षी ३० क्विंटलपर्यंतच्या मालाचा पुरवठाप्रत्येक वर्षी होळीच्या १५ दिवस आधी जवळपास ३० क्विंटल पर्यंत च्या ठोक व किरकोळ मालाची मागणी होत असल्याने पुरवठा करण्यासाठी हार कंगनच्या मालाची मोठ्या मेहनतीने शेख कुटुंबीय निर्मिती करीत आहेत.सामाजिक प्रतिष्ठा मिळालीया व्यवसाया व्यतिरिक्त हे कुटूंब तालुक्यातील फत्तेपूर, तोंडापुर व बोदवड या ठिकाणच्या आठवडे बाजारात फरसाण विक्रीचा व्यवसाय करतात. हार व कंगन च्या पारंपरिक व्यवसायातून शेख यांच्या कुटूंबियांचा लौकिक पंचक्रोशीत पसरा असून या परिवाराला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे .
जामनेरच्या कुटुंबाला मिळाली हार-कंगन व्यवसायामुळे सामाजिक प्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:45 IST
४० वर्षांपूर्वी केली व्यवसायाला सुरुवात आता प्रत्येक वर्षी केला जातो ३० क्विंटल मालाचा पुरवठा
जामनेरच्या कुटुंबाला मिळाली हार-कंगन व्यवसायामुळे सामाजिक प्रतिष्ठा
ठळक मुद्देप्रत्येक वर्षी ३० क्विंटलपर्यंतच्या मालाचा पुरवठाशेख कुटुंबाला या व्यवसायामुळे मिळाली सामाजिक प्रतिष्ठाहार-कंगण सोबत आठवडे बाजारात फरसाण विक्रीचा व्यवसाय