शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यात मकाचे क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:05 IST

जामनेर तालुक्यात गेल्या रबी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुभार्वास सुरुवात झाल्याने या वर्षाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत मका पिकावरील जवळपास १० टक्के पिकपेरा घटून कापूस पीकपेरा वाढणार असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.

ठळक मुद्देकापूस, कडधान्य वाढणारप्रतीक्षा पावसाचीमशागतीच्या कामांना वेग!

जामनेर, जि.जळगाव : तालुक्यात गेल्या रबी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुभार्वास सुरुवात झाल्याने या वर्षाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत मका पिकावरील जवळपास १० टक्के पिकपेरा घटून कापूस पीकपेरा वाढणार असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे बागायती कपाशी लागवडीवरही याचे परिणाम झाले आहेत.दरम्यान, खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी आता नव्या उमेदीने पेरणीपूर्वी मशागतीच्या कामाला लागले आहेत. तालुक्यात आर्थिक गाडा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे तालुक्यात एकूण १ लाख ९५२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होते. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असून शेतात सध्या शेणखत टाकणे, शेताला कुंपण करणे, काडी कचरा उचलणे, नांगरणे, कुळवाच्या पाळ्या देणे, ठिबंक टाकणे आदी कामे गतीने सुरु आहे .या अगोदर लग्णसराई जोरात होती. त्यामुळे शेताच्या मशागतीच्या कामांना विलंब झाला.कापूस क्षेत्र वाढणार?तालुक्यातील कपाशीचे क्षेत्र १० टक्क्यांनी वाढेल व मका क्षेत्र घटेल गेल्या वर्षी खरीप हंगामात तालुक्यात ६० हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. आता ६२ हजार ७४० हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे. तसेच मका १८ हजार ७६२ हेक्टर, ज्वारी ३ हजार १४० हेक्टर, तुर ४ हजार १२० हेक्टर, मूग २ हजार ११५ हेक्टर, उडीद १ हजार ८५० हेक्टर आदी लागवडीची शक्यता आहे .कृषी विभागाकडून तालुक्यासाठी खते व बी बीयाणांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध राहतील कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांनी पेरणीच्या योग्य काळातच पेरणी करावी. तसेच जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाल्यानंतरच कापसाची लागवड करावी. बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्के बील घ्यावे.-रमेश जाधव, कृषी अधिकारी जामनेर 

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर