शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 17:46 IST

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे चाºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देअति पावसामुळे पिके कुजलीचारा सडलापशुपालक हवालदिल

लियाकत सय्यदजामनेर, जि.जळगाव : तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे चाºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला असून पशुपालकांची चिंता वाढली आहे.तालुक्यात काठेवाडी समाजाचे होळ हवेली हे गाव सर्वात जास्त दूध उत्पादन करणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे व त्यांचा एकमेव व्यवसाय दुग्ध आहे. गावात जवळपास १५०० गुरे आहेत. आॅक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे येथे भीषण चाराटंचाई निर्माण झाली असून, दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यात संपूर्ण चारा सडला आहे. या निकृष्ट चाºयामुळे दुधात प्रचंड घट झाली आहे. यामुळे हा व्यवसाय करणेदेखील परवडत नसल्याचे पशुपालक सांगतात. मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकापासून गुरांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत होता. यामुळेच येथील शेतकरी हे पीक घेत होते. मात्र यंदा संपूर्ण पीक कुजून गेले असून, उत्पन्न बुडाले आहे. त्यात त्यापासून मिळणारा चाराही सडला आहे. मका, बाजरी सरमट यांची कुट्टी करून यामध्ये भुईमुगाचा पाला मिसळून हा कसदार पुरवठा गुरांना करण्यात येत होता. मात्र यंदा सडका चारा गुरांना खाऊ घालणेदेखील धोक्याचे झाले आहे. कोरडा व हिरवा असा दोन्ही प्रकारचा कसदार चारा असेल तर दुधाचे प्रमाणदेखील वाढते चारा कसा आहे यावरच दुग्ध व्यवसाय अवलंबून असतो. यामुळे निम्म्यावर दूध उत्पादन येऊन ठेपले आहे. याउलट पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ७० किलो सरकी ढेप पोत्याची किंमत १८०० रुपये, तर ३० रुपये किलो असल्याचे पशुपालकांनी सांगितले. मात्र उदरनिर्वाहासाठी असलेला दुग्ध व्यवसायदेखील चाºयाअभावी अडचणीत असल्यामुळे येथील पशुपालक संकटात सापडला आहेत.रब्बी हंगामही लांबणार?खरीप हंगामातील उत्पन्नावरच रब्बी हंगाम अवलंबून असतो. मात्र खरिपाचे गणित बिघडल्याने रब्बी हंगाम लांबणीवर आहे. बºयाच ठिकाणी शेतकरी वर्ग शेतात कापूस पीक उपटून रब्बीची लागवड करण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरणीला डिसेंबर अखेरपर्यंत वेळ लागू शकतो.यावलमधून चाºयाची आवकतालुक्यात परतीच्या पावसामुळे चारादेखील सडका झाला आहे. पशुपालक हे यावल तालुक्यातील यावल, बामणोद, वड्री व या भागातील परिसरातून चारा आणत आहेत.चाºयाअभावी दुधात प्रचंड घट झाली आहे. याउलट पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ओला दुष्काळ असला तरी जास्त पाण्यामुळे चारा सडला आहे. कोरडा चारा येथे कुठे शिल्लक नाही. नाईलाज गुरांसाठी यावल तालुक्यामधून चारा आणावा लागत आहे.-बिजल लाखा, दुग्ध व्यवसायिक, होळ हवेली, ता.जामनेर

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर