जामनेर, जि.जळगाव : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण निघू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण दिसत आहे. शनिवारी स्वॅब घेतलेल्या सातपैकी सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. चाळीस मोहल्ला भागातील ३४ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बाधितांची संख्या सहा झाली आहे.लॉकडाऊन काळात नागरिकांनी व प्रशासनाने काळजी घेऊनही पाळधी, दोंदवडे, नाचणखेडे, गारखेडे व जामनेरला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील तेरा रुग्णांपैकी तीन मयत असून शंभराहून जास्त क्वॉरंटाईन आहे.पाळधी येथे मुंबईहून आलेल्या इसमामुळे दोघांना लागण झाली. दोंदवाडे येथील मृत वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील एकाच अहवाल पॉझिटिव्ह आला. पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर येथील रहिवासी व चाळीसगाव पोलीस दलात कार्यालयात कार्यरत पोलीस बाधित आढळल्याने जामनेरकरांच्या छातीत धडकी भरली होती.जामनेर शहरात कोरोनाचा शिरकाव धोक्याची घंटी ठरत आहे. मथाई ागरमधील पती, पत्नी, जुना बोदवड रोडवरील व महावीर मार्गावरील मृत महिला व पुरुष, भीमनगरमधील महिला असे पाच जण पॉझिटिव्ह आहे.शहरात गेल्या महिन्यात मृत्यूची वाढलेली संख्या चिंताजनक आहे. यात विविध वयोगटातील महिला व पुरुषांचा समावेश असून, त्यातील काही दुर्धर आजाराने ग्रस्त होते. काहींचे जळगाव येथे उपचार घेताना स्वॅब घेतले गेले. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहे, ही चिंता वाढविणारी बाब आहे. बाधिताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नियमांचे पालन न करता व काळजी न घेतल्याची चर्चा आहे. काही नागरिक आजाराची माहिती लपवत असल्याने ते धोकेदायक ठरू शकते.लॉकडाऊन पाचमध्ये मिळालेल्या शिथिलतेनंतर बाजारपेठेतील गर्दी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविणारी ठरत आहे.नागरिकांनी जागरुक राहून सर्दी, खोकला व तापाची लक्षणे दिसत असल्यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात कोणतीही भीती न बाळगता उपचार घ्यावे.-डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर
जामनेरला बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 17:42 IST
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण निघू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण दिसत आहे.
जामनेरला बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक
ठळक मुद्देजामनेर शहरात सहा रुग्णग्रामीण भागात सात बाधित, तीन मयत