शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरात ३०० कोटींच्या निधीचा तपशील मागून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:01 IST

जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावर सुरु झाले आरोप-प्रत्यारोप

ठळक मुद्देविकासकामांसाठी ३०० कोटींचा निधी शासनाकडून आणल्याचा दावा३०० कोटींच्या कामाबाबत राष्ट्रवादीने मागितला तपशीलभाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे पलटवार

आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.१५ : नगरपालिका निवडणूक जवळ येत असतांनाच सोशल मिडीयावर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपा विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना असा सामना रंगत आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी विकासासाठी आणलेल्या ३०० कोटींच्या निधीचा तपशील मागुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडुन होत आहे.नगरपालिकेकडुन मंजुर झालेल्या कामांच्या भुमीपुजन व पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण कार्यक्रम होत आहेत. शहराच्या विकासासाठी शासनाकडुन ३०० कोटी आणल्याचा दावा मंत्री महाजन करीत आहे. नेमकी याच विषयाची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.असे आहेत आक्षेपविकासासाठी मिळालेल्या ३०० कोटीबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तपशिलाची मागणी करीत आहे. त्याच बरोबर काँग्रेस आघाडीच्या काळातील नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी मिळविलेल्या निधीतुनच कामे होत असल्याचा त्यांचा दावा आहे. होत असलेल्या कामाची गुणवत्ता संशयास्पद असल्याची ओरड देखील केली जात असुन कामे करीत असलेल्या ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत. रस्ते खोदणे, बुजणे व जलवाहिनीसाठी किंवा भुमिगत गटारीसाठी वारंवार पुन्हा तेच करणे यालाच विकास म्हणतात काय? असा खोचक सवाल विरोधक विचारीत आहे.भाजप कार्यकर्त्यांचा पलटवारविरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांना भाजप कार्यकर्ते व समर्थक जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. मागील निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस आघाडीला बहुमताने सत्ता सोपवुन देखील त्यांच्यातीलच काही नगरसेवकांनी भाजपशी तडजोड करुन सत्तेची सुत्रे सोपविल्याचा आरोप केला जातो. तसेच या फुटीर नगरसेवकांना मतदारच धडा शिकवतील असा पलटवार केला जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर