शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

जामनेर तलाठी कार्यालयाचे विभाजन लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:33 IST

जामनेर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाकडून तलाठी कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षा मात्र विभाजनाचे काम लांबणीवर पडले आहे.

ठळक मुद्देअनेक महिन्यांपासून सहाय्यक तलाठी पद रिक्तवाढती लोकसंख्या पाहता कामाचा बोजा वाढलानागरिकांचे होत आहेत कामे

जामनेर : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाकडून तलाठी कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षा मात्र विभाजनाचे काम लांबणीवर पडले आहे. परिणामी मुख्य कार्यालयातील अपुऱ्या मनुष्य बळामुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. सहाय्यक तलाठी पद रिक्त असून ते तातडीने भरावे, अशी मागणी होत आहे.शहराची वाढलेली लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता तलाठी कार्यालयावर कामाचा बोजा पडतो. सातबारा उतारे, शेतजमिनीचे आवश्यक दस्तावेज मिळविण्यासाठी नागरिकांना तासनतास थांबावे लागते. कोतवाल पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. या महिन्यात येथे कोतवालाची नियुक्ती झालेली आहे, मात्र सहाय्यक तलाठीपद रिक्तच आहे.तलाठी कार्यालयाचे विभाजन करून पूरा भागात, पश्चिम भाग एक असे दोन नवीन व मुख्य तलाठी कार्यालय असे विभाजनाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली. मात्र अंमलबजावणी झालेली नाही. बुधवारी सकाळी या कार्यालयात कामांसाठी आलेल्या नागरिकांना तलाठी व कोतवाल नसल्याने प्रतीक्षा करावी लागली. त्यांच्याकडे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची कामे सोपविल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी तलाठी कार्यालयाची या विभाजनाची अंमलबजावणी तातडीने करावी व सहाय्यक तलाठी पद भरावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :JamnerजामनेरJalgaonजळगाव