जळगाव : जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत संथगतीने मतदान सुरू होते.सकाळी पहिल्या दोन तासात खूपच धिम्या गतीने मतदान झाले. शिवाजीनगर, बळीरामपेठ, शनिपेठ, कांचननगर या भागात ३ ते ५ टक्के मतदान बहुतांश केंद्रावर आढळले. सर्वात कमी ३ टक्के मतदान कांचन नगर भागातील सोनवणे समाज मंदिरातील प्रभाग २ च्या केंद्रात दिसून आले. तर शनिपेठेतील रिधूर वाड्यातील प्रभाग ४ मधील केंद्रावर सुमारे १० टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. बळीराम पेठेतील यादव शाळा वगळता पहिल्या दोन तासात एकाही ठिकाणी मतदानासाठी रांग दिसून आली नाही.केंद्रावर पाणी पुरवठ्याबाबत नाराजीएका मतदान केंद्रावर पाण्याचा एकच जार देण्यात येत होता. एका केंद्रावर पोलीस आणि कर्मचारी असे सुमारे ३० जण असल्याने एक जार कसा पुरणार? अशी शंका शिवाजीनगरात एका ठिकाणी उपस्थित होवून २ जारची मागणी केली असता संबंधित पुरवठा करणाऱ्या कर्मचा-याने ती नाकारली. यामुळे नाराजी व्यक्त झाली.मतदारांना समजविण्यात अधिका-यांची कसरतयंदा एकाच मशीनवरुन चार मते टाकायची असल्याने अनेक मतदारांना हा प्रकार लक्षात येत नव्हता. यामुळे कक्ष अधिका-याला बहुतेक मतदारांना समजवून सांगावे लागत होते.
जळगाव मनपा निवडणूक : सकाळी ११ वाजेपर्यंत संथ गतीने मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:02 IST
मतदारांना समजविण्यात अधिका-यांची कसरत
जळगाव मनपा निवडणूक : सकाळी ११ वाजेपर्यंत संथ गतीने मतदान
ठळक मुद्देकेंद्रावर पाणी पुरवठ्याबाबत नाराजीकांचननगर या भागात ५ टक्के मतदान