जळगाव : मनपा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. प्रभाग ११ मधील बहिणाबाई ज्ञान विकास माध्यमिक विद्यालयातील बुथ क्रमांक १ मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे अर्धातास मतदान थांबविण्यात आले होते. यामुळे या ठिकाणी मतदारांचा रांगा लागल्या होत्या. तत्काळ मतदान यंत्राची दुरुस्ती केल्यानंतर १०.३० वाजेपासून मतदानाला पून्हा सुरुवात झाली.सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. अनेक प्रभागांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला. तर काही मतदान केंद्रावर मात्र शुकशुकाट होता. प्रभाग १२ व प्रभाग ११ मधील काही मतदार केंद्रावर मतदारांना मतदार याद्यांमध्ये नावे सापडले नाही. त्यामुळे बहिणाबाई माध्यमिक विद्यालय, भोईटे शाळा, भगीरथ शाळेमधील मतदान कें द्रावर अनेक मतदार नाव न सापडल्याने मतदान न करताच परत गेले. विधानसभेच्या मतदार यादीवरुन मतदार यादी तयार करण्यात आल्यामुळे ज्या मतदारांचे नाव विधानभसभेच्या यादीत नाही अशा मतदारांचे नाव या यादीत देखील असणार नसल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जळगाव मनपा निवडणूक : बहिणाबाई ज्ञान विकास माध्यमिक शाळेत अर्धातास थांबवले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:58 IST
मतदान यंत्रात बिघाड
जळगाव मनपा निवडणूक : बहिणाबाई ज्ञान विकास माध्यमिक शाळेत अर्धातास थांबवले मतदान
ठळक मुद्देमतदार यादी नाव न सापडल्याने गोंधळतत्काळ मतदान यंत्राची दुरुस्ती