शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म बदलवण्यावरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:11 IST

शिवसेनेची तक्रार

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांनी तपासले मनपातील सीसीटीव्ही फुटेजचार वाजता पुन्हा आली मनपात कार

जळगाव : भाजपा आमदारांनी दुपारी २.३० वाजता एबी फॉर्म दिल्यानंतर पुन्हा दुपारी मुदत संपल्यानंतर ४ वाजता भाजपाने काही उमेदवारांचे एबी फॉर्म बदलवल्याचा आरोप शिवसेनेच्या काही पदाधिकाºयांनी केल्याने मनपात गोंधळ झाला. या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून मनपा आयुक्तांकडे तक्रार केली.बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मनपामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी २ वाजता शिवसेनेकडून शहर संघटक दिनेश जगताप यांनी आपल्या ७५ उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केले. त्यानंतर दुपारी २.३० वाजता आमदार सुरेश भोळे यांनी भाजपच्या ७५ उमेदवारांचे एबी फॉर्म सादर केले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी वेळेच्या आतच एबी फॉर्म दाखल केले होते. मात्र, त्यानंतर भाजपाकडून दुपारी चार वाजता काही उमेदवारांचे एबी फॉर्म परत घेवून त्यांच्या जागेवर इतर उमेदवारांसाठी एबी फॉर्म दिल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी केला.दुपारी ४ वाजता दोन पदाधिकाºयांनी आणले एबी फॉर्मचेतन शिरसाळे यांच्या आरोपानुसार दुपारी ४ वाजता जी. जे.०५, जे. एफ.६०६६ या क्रमांकाच्या कारमधून भाजपचे दोन पदाधिकारी मनपात दाखल झाले. तसेच त्यांच्याकडे भाजपच्या काही उमेदवारांचे एबी फॉर्म होते. या आधी दुपारी आमदारांनी दिलेल्या मतदार यादीमधील काही उमेदवारांचे एबी फॉर्म परत घेवून त्यांच्या जागेवर इतर उमेदवारांसाठीचे एबी फॉर्म परत देण्यात आले. मात्र, तोपर्यंत मुदत संपली होती असे शिरसाळे म्हणाले.आयुक्तांची घेतली भेटसीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शिवसेना पदाधिकाºयांनी मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांची भेट घेत चौकशीची मागणी केली. त्यावर डांगे यांनी असला कोणताही प्रकार झाला नसल्याची माहिती दिली. तरीही तथ्य आढळल्यास चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले. मात्र, शिवसेना पदाधिकारी आरोपांवर ठाम होते.सीसीटीव्ही व चित्रीकरण तपासलेनिवडणूक निर्णय अधिकाºयांनी शिवसेना पदाधिकाºयांचे आरोप फेटाळून लावले. मात्र, शिवसेना पदाधिकारी ठाम असल्याने मनपाकडून झालेले चित्रीकरण तपासण्याची मागणी केली. निवडणूक अधिकाºयांच्या परवानगीने सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. यामध्ये दुपारी ४ वाजता जी.जे.०५,जे.एफ.६०६६ क्रमांकाची कार मनपा परिसरात येते,मात्र त्यामधून भाजपाचे कोणते पदाधिकारी उतरले हे स्पष्ट झाले नाही.शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मनपात दाखलवेळ संपल्यानंतर भाजपाने एबी फॉर्म बदलवल्याबाबत माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार आर.ओ.पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिलीप दळवी, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, शहर संघटक दिनेश जगताप, राहुल नेतलेकर मनपात दाखल झाले. तसेच निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे तक्रार केली.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव