शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जळगाव-मुंबई विमानसेवेला जळगावकरांचा वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 16:37 IST

प्रतिसादासाठी कंपन्याही सरसावल्या

ठळक मुद्दे ४ जानेवारीपर्यंतची बहुतांश तिकिटे संपली२ जानेवारीचे तिकिट ४४९९ रूपयेजैन इरिगेशनतर्फे दररोज ३ तिकिटे राखीव

जळगाव: गेल्या ७ वर्षांपासून विमानसेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगावकरांचा प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ४ जानेवारीपर्यंतची बहुतांश तिकीटे बुक झाली आहेत.  सेवा पडणार तोकडीविमान कंपन्यांना जळगावातून विमानसेवेला किती प्रतिसाद मिळेल? याबाबत साशंकता होती. उद्योजकांच्या संघटनांनी, तसेच मोठ्या उद्योग समूहांनी विमानसेवेला निश्चीत प्रतिसाद मिळेल, अशी खात्री व्यक्त केली होती. मात्र विमान कंपन्या साशंक असल्याने विमानसेवा सुरू होऊ शकली नव्हती. अखेर केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून विमानसेवा देण्यास एअर डेक्कन कंपनीने तयारी दर्शविली आहे. २३ डिसेंबरपासून ही सेवा सुरू होत आहे. मात्र सेवा सुरू होण्याच्या आठवडा भर आधीच दोन आठवड्यांची तिकीटे विक्री झाली आहे. जळगावकरांचा हा प्रतिसाद पाहता ही १९ आसनी व दिवसातून एक वेळची विमानसेवा भविष्यात तोकडी पडणार आहे.विमानसेवेला पोषक वातावरण जिल्'ाच्या सीमेवरच अजिंठा व वेरूळची लेणी आहेत. त्यासाठी आतापर्यंत देशभरातील तसेच परदेशी पर्यटक हे औरंगाबादपर्यंतच विमानसेवा असल्याने तेथे उतरून तेथून बसने येत असत. मात्र आता थेट विमानसेवेची सोय झाल्याने पर्यटकही जळगावच्या विमानसेवेलाच प्राधान्य देणार हे स्पष्ट आहे. याखेरीज उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ व विविध महाविद्यालयांमध्ये विविध कॉन्फरन्सच्या निमित्ताने, तर जैन हिल्स येथील गांधी तीर्थ पाहण्यासाठी देशातून तसेच परदेशातूनही लोक येतात. त्यांचेही यापुढे साहजिकच विमानसेवेला प्राधान्य राहणार आहे. याखेरीज जैन इरिगेशन, सुप्रीम इंडस्ट्रीज, रेमंड यासह अनेक मोठे उद्योगधंदे आहेत. जळगावची सुवर्णबाजारपेठ देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातून तसेच परदेशातूनही उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने अनेक बड्या व्यक्तींची जळगावला ये-जा सुरू असते. त्यांचेही विमानसेवेला प्राधान्य मिळणार आहे.जैन इरिगेशनतर्फे दररोज ३ तिकिटे राखीवविमानसेवेला बळकटीमिळेपर्यंत प्रतिसाद कायम राहण्यासाठी जैन इरिगेशन कंपनीने पुढाकार घेतला असून दररोज विमान सेवेची ३ तिकिटे कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत.२ जानेवारीचे तिकिट ४४९९ रूपयेकंपनीकडून सुरूवातीला काही दिवस विमानसेवेला प्रतिसाद मिळावा म्हणून प्रतिव्यक्ती १४२० रूपये भाडे आकारले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २५०० रूपये भाडे आकारणी केली जात आहे. त्यात आता २ जानेवारी रोजी एक दिवसासाठी भाडेवाढ करण्यात आली असून प्रतीव्यक्ती ४४९९ रूपये भाडे आकारण्यात आले आहे. तरी देखील या दिवसाची केवळ ३ तिकिटे शिल्लक आहेत.