शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

जळगावकर घेतोय दिग्गज खेळाडूंची फिरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 1:10 PM

आकाश नेवे  जळगाव : ला.ना. शाळेकडून खेळणारा विद्यार्थी ते मुंबईच्या रणजी संघाचा सदस्य आणि एकाच डावात पाच आणि संपूर्ण ...

आकाश नेवे जळगाव : ला.ना. शाळेकडून खेळणारा विद्यार्थी ते मुंबईच्या रणजी संघाचा सदस्य आणि एकाच डावात पाच आणि संपूर्ण सामन्यात ९ गडी बाद करणारा शशांक अत्तरदे याची आता स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. मुंबईच्या संघातून खेळताना त्याने युसुफ पठाण आणि दीपक हुड्डा या अनुभवी खेळाडूंना बाद केले आहे.जैन स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू असलेल्या शशांक अत्तरदे हा मुंबईच्या टाईम्स शिल्ड स्पर्धेत जैन इरिगेशनच्या कार्पोरेट संघाकडून खेळायचा. त्यानंतर त्याने मुंबईच्या ए डिव्हिजन क्रिकेट सामन्यात व्हिक्टरी क्लबकडून खेळायला सुरुवात केली. बॉलिंग आॅल राऊंडर असलेल्या शशांक याने काही काळातच आपल्या खेळाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने उजव्या हाताचा आॅफ स्पिनर असलेल्या शशांक याच्या गोलंदाजीतील अचुकता आणि भेदकता यामुळे त्याला मुंबईच्या संघात स्थान मिळाले. त्याने तीन डिसेंबर २०१९ ला मुंबईकडून रणजी संघात पदार्पण केले. त्या आधी तो विजय हजारे चषकात मुंबईकडून गोवा आणि झारखंड विरोधातील सामन्यात खेळला होता. मुंबईकडून रणजीत बडोदा संघाविरुद्ध खेळताना त्याने दोन्ही डावात प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यामुळे सहाजिकच त्याला पुढच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.विशेष सामनामुंबईकडून रणजीत बडोदा संघाविरुद्धचा सामना शशांक अत्तरदे याच्यासाठी विशेष ठरला. या सामन्यात मुंबईने कर्नाटकला पराभूत केले असले तरी एकट्या शशांकने मुंबईकडून खिंड लढवली. त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्यात अभिमन्यु मिथून आणि श्रेयस गोपाल यांचाही समावेश होता. बडोद्याविरोधात खेळताना त्याने दीपक हुड्डा आणि युसुफ पठाण यांचे बळी घेण्याची कामगिरी केली होती.ला.ना. सार्वजनिक विद्यालयाकडून खेळताना सुरूवातीच्या काळात त्याला क्रीडा शिक्षक दीपक आर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतरच्या काळात जैन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये अविनाश आवारे, संदीप दहाड, मुश्ताक अली यांनी त्याच्या खेळाला पैलु पाडले. तो जळगाव जिल्हा १६ वर्षाआतील आणि १९ वर्षाआतील संघाचा कर्णधार देखील राहिला आहे.शशांक अत्तरदे याने आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये बाहेती महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धांमध्ये तो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कर्णधार देखील होता.क्रिकेट खेळताना नेहमीच कुटुंबाने पाठिंबा दिला. स्पर्धांमुळे बऱ्याचदा शाळेला दांडी मारावी लागत असे, मात्र त्यावेळी आई आणि बाबांनी खेळाला प्रोत्साहन दिले. रणजीतील निवडीबद्दल असे सांगावासे वाटते की, मी मेहनत घेत होतो. मात्र निवडीचे कळाल्यानंतर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. मुंबईच्या रणजी संघाकडून खेळणे हे एक स्वप्न होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव