शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

समांतर रस्त्यासाठी जळगावकर रस्त्यावर

By admin | Updated: January 31, 2017 00:16 IST

‘जळगाव फस्र्ट’तर्फे आठ कि.मी. पदयात्रा : लोकप्रतिनिधी, विविध 60 संस्था, विद्याथ्र्यासह महिलांचा सहभाग, प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार,

जळगाव : जळगाव शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अपघात होऊन निरपराधांचे बळी जाणे नित्याचेच झाले असल्याने यावर उपाययोजना म्हणून तातडीने समांतर रस्त्यांचा विकास करण्यात यावा, या मागणीकडे लोकप्रतिनिधी व सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी ‘जळगाव फस्र्ट’ या अराजकीय मंचच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी रोजी शांततामय मार्गाने आयोजित पदयात्रेत मोठय़ा संख्येने जळगावकरांनी सहभाग घेत तब्बल आठ कि.मी. पायी चालत आपला असंतोष व्यक्त केला. समांतर रस्त्यासाठी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरलेल्या  जळगावकरांसोबत साठ संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला सहभागी झाल्या होत्या. पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती देऊन आपापली जबाबदारी पार पाडू असे अभिवचन दिले. महामार्गालगत समांतर रस्ते नसणे,  सुरक्षित महामार्ग क्रॉसिंग नसणे, रहदारीचे नियम व्यवस्थित न पाळणे इत्यादी कारणांनी तरुण, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदींचा मृत्यू महामार्गावरील अपघातांमुळे झाला आहे.  नशिराबाद नाका ते बांभोरी गिरणा पूल या दहा किलोमीटर अंतरात समांतर रस्ते विकसित नसल्यामुळे सर्वच वाहनांना महामार्गाचा वापर करावा लागतो. परिणामी मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे समांतर रस्त्यांचा विकास करून या अपघातांना आळा बसावा या मागणीसाठी ‘जळगाव फस्र्ट’ संघटनेचे प्रणेते डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पुढाकार घेत हा गांधी मार्च आयोजित केला होता.  वैशिष्टय़े.. 4वेळेवर पदयात्रा सुरू, काटेकोर वेळेचे पालन49.30 वाजता अजिंठा चौफुलीपासून सुरुवात होऊन न थांबता खोटेनगरला पदयात्रा पोहचली4पदयात्रेत सर्व जण शिस्तीत रांगेत चालून रहदारीला सहकार्य 4घोषणा न देता शांततामय पदयात्रा 4हातात फलक घेऊन आपले म्हणणे मांडत मार्गक्रमण4वाहनावरील लाऊडस्पीकरवरील देशभक्तीपर गीतांनी प्रोत्साहन ‘लोकमत’चा अंक सभेतराष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरील ताण कमी व्हावा व अपघात टळावेत यासाठी समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. या समांतर रस्त्याच्या रेंगाळलेल्या प्रक्रियेस गती यावी  यासंदर्भात ‘लोकमत’ पाठपुरावा करीत आहे. याविषयी ‘लोकमत’ने 30 जानेवारी रोजी विशेष पान  प्रसिद्ध करून अपघात व बळींची संख्या देत या प्रश्नाविषयी गांभीर्य मांडले आहे. या पाठपुराव्याविषयी पदयात्रेच्या समारोपप्रसंगी झालेल्या सभेत ‘लोकमत’चा अंकच सभेत दाखविण्यात आला. या वेळी हा प्रश्न किती गंभीर आहे, हे वक्त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. आमदार, लोकप्रतिनिधीही पायीपदयात्रेत सामान्य जळगावकरांसोबत लोकप्रतिनिधीही अजिंठा चौफुली ते खोटेनगर थांब्यार्पयत पायीच चालत सहभागी झाले होते. यामध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त आमदार चंदूलाल पटेल हे प्रभात चौकातून सहभागी झाले होते.अन्यथा साखळी उपोषणजळगावातील लोकप्रतिनिधी हा प्रश्न मार्गी लावू शकत नसल्याचे चित्र आहे. 4 रोजीच्या सभेनंतरही हा प्रश्न मार्गी लागला नाही तर विविध संघटनांचे पदाधिकारी साखळी उपोषणास बसतील, असा इशारा समारोपप्रसंगी देण्यात आला.