शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीकडून प्रयत्न, शिवसेनेच्या अनेक सदस्यांना भाजपचा दूरध्वनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:16 IST

...तर मग महाविकास आघाडीची सत्ता

जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीकडून पर्यायाने राष्ट्रवादीकडून होणारे सर्वोतोपरी प्रयत्न लक्षात घेता, भाजपकडून थेट शिवसेना सदस्यांशी संपर्क साधून विचारपूस सुरू झाली आहे़ शिवसेनेच्या अनेक सदस्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मंगळवारी फोन आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़दरम्यान, राष्ट्रवादीच्या संपर्क असलेल्या भाजपच्या त्या तीन सदस्यांबाबतचा सस्पेंस संपला असून ते तिघेही सोमवारी रात्री भाजपच्या गोटात सहभागी झाल्याचेही वृत्त आहे़ जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सोडून अन्य तीन पक्षांचे सदस्य सहलीला रवाना झालेले आहेत़ राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेत तिनही पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्यांच्याकडून होणारे दावे बघता भाजपने धोकाओळखून म्हणून सदस्यांना अज्ञातस्थळी हलविले आहे़भाजपच्या तीन सदस्यांबाबात साशंकता निर्माण झालेली होती़ हे सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता़ तर हे सदस्य आमच्यासोबतच आहेत. असा प्रतिदावा भाजपने केला होता, मात्र, या सदस्यांबाबतचा निर्माण झालेल्या संभ्रमामुळे जिल्हा परिषदेत बदलाचे वारे अधिकच वेगाने वाहू लागले होते़ मात्र, हे तीनही सदस्य सोमवारी रात्री भाजपच्या अन्य सदस्यांसोबत सहभागीझाले़ भाजपच्या सदस्यांची संख्या ३३ झाली असून अन्य पक्षांचे काही सदस्य आमच्यासोबतच आहेत, काँग्रेसही आम्हालाच मतदान करेल, असा विश्वास भाजपच्या सदस्यांना असून महाविकास आघाडीची आशा मावळल्याचा दावा भाजपकडून होत आहे़ दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत अजिंठा विश्रामगृहात जि़ प़ सदस्यांची दुपारी चार ते पाच यावेळेत बैठक होण्याची शक्यता आहे़रात्री उशिरापर्यंत संपर्ककाँग्रेसचे सदस्यांनी रात्री उशिरा शिवसेनेच्या सदस्यांशी संपर्क केला, शिवाय राष्ट्रवादीकडूनही संपर्क सुरू असून मंगळवारी मात्र, अचानक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या सदस्यांना फोन करून चाचपणी केली़ राष्ट्रवादी- काँग्रेस- शिवसेना हे सदस्य एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली.राष्ट्रवादीचे एक व शिवसेनेचे एक असे दोन सदस्य अपात्र झाल्यामुळे महाविकास आघाडीचे गणित फिस्कटले़ मात्र, जिल्हाधिकाºयांचा हा निर्णय असल्याने याला स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ शिवाय यासंदर्भात ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही पक्षाकडून याबाबत पाठपुरावा सुरू असून येत्या एक दोन दिवसात अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत़ या दोन सदस्यांचे चित्र स्पष्ट झाल्यास सर्व सदस्य परतून भाजपच्या काही सदस्यांना गैरहजर ठेवून महाविकास आघाडी विनाअडथळा सत्ता स्थापन करेल.शिवसेनचे एकही सदस्य फूटलेले नाही व फुटणारही नाही, सर्व सदस्यांवर आमचा विश्वास आहे़ शिवसेनेच सर्व सदस्य जिल्ह्यातच थांबून आहे़ बुधवारी पक्षाचे नेते बैठक घेणार आहे व त्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतील़- नानाभाऊ महाजन, सदस्य शिवसेना

टॅग्स :Jalgaonजळगाव