शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By विजय.सैतवाल | Updated: October 16, 2023 15:53 IST

Jalgaon News: एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेचा धक्का (शॉक) लागून राहुल दरबार राठोड या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर सोबत असलेला दुसरा कामगार जीवन गजानन चौधरी हा गंभीररीत्या भाजला गेला.

- विजयकुमार सैतवालजळगाव - एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेचा धक्का (शॉक) लागून राहुल दरबार राठोड (२२, रा. शेलगाव, ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश, ह.मु. फातीमा नगर, जळगाव) या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर सोबत असलेला दुसरा कामगार जीवन गजानन चौधरी (रा. बेदावद ता. जामनेर) हा गंभीररीत्या भाजला गेला. ही घटना सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. मयत तरुण घरातील कर्ता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

राहुल राठोड हा तरुण आई-वडील व लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमा नगरात वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाचा पहिला दिवस असल्याने सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कामावर हजर झाला. यावेळी काम करीत असताना त्याला विजेचा धक्का (शॉक) लागला. सोबत असलेला जीवन गजानन चौधरी हा गंभीररित्या भाजला गेला आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी राहुलला मयत घोषित केले. तर जखमीस खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून राहुल हा एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींग करण्याचे काम करत होता. नंतर सोमवारपासून त्याने प्लास्टीक कंपनीत कामाला सुरूवात केली होती. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याचा दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव