शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील गिरणा पंपिंगच्या जागी आता लवकरच होणार पर्यटनस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:50 IST

अंदाजपत्रक बनविण्याचा सूचना

जळगाव : मनपाच्या बंद पडलेल्या गिरणा पंपीगच्या जागेवर वॉटरपार्कसह पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी शासनाच्या पर्यटन विकास मंत्रालयाने हिरवा कं दील दिला आहे. मनपाकडून याबाबत अंदाजपत्रक तयार करण्याचा सूचना दिल्या आहेत. स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी याबाबत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्र पाठवून मागणी केली होती.राज्य शासनाकडून अंदाजपत्रक तयार करण्याबाबत आदेश मिळाल्यानंतर शुक्रवारी या जागेची पाहणी करण्यात आली. यात स्थायी समिती सभापती मराठे, शहर अभियंता सुनील भोळे, पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके व विकास आराखडा तयार करून देणारे वास्तुविशारद किशोर पाटील यांनी या गिरणा पंपीगच्या जागेची पाहणी केली. पंधरा दिवसात हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र मराठे यांनी दिली.मनपाच्या उत्पन्नांचा स्त्रोत वाढेलगिरणा नदीच्या पात्राजवळच लागून मनपाची आठ एकर जागा आहे. याठिकाणी आधी मनपाचे रॉ वॉटर स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्र होते. मात्र, हे केंद्र अनेक बंद पडले असून, या जागेचा कोणताही वापर सध्या होत नाही.त्यामुळे या जागेवर पर्यटनस्थळ विकसीत करून वॉटरपार्क तयार केल्यास शहरवासियांना देखील फायदा होणार असून, यासह मनपाच्या उत्पन्नाचा स्त्रोत देखील वाढणार आहे. लवकरच गिरणा नदीवर सात बलून बंधारे तयार केले जाणार आहेत. त्यात एक बंधारा राष्टÑीय महामार्गाच्या बायपाससाठी तयार होणाऱ्या पुलाखालून होणार असल्याने या बंधाºयाचे बॅक वॉटर गिरणा पंपीगपर्यंत येणार आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी नवीन पर्यटनस्थळ विकसीत होण्यास मदत होणार आहे.जुन्या सामुग्रीची विक्री करणारगिरणा पंपीगच्या ठिकाणी मनपा मालकीची जुनी यंत्र सामुग्री धुळखात पडली आहे. या जुन्या मशिनरीचा लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत ‘वॉटर पार्क व पर्यटन स्थळ तयार करण्यासाठी वास्तुविशारद म्हणून किशोर पाटील यांची नेमणूक केली आहे. यासाठी गिरणा नदीपात्राजवळील पाणी उचलकरून ‘वॉटरपार्क’ तयार करण्यात येणार असून, यात वॉटर डायव्हींग, वॉटर फॉल, रेन डान्सींग वॉटर, म्युजीक वॉटर तसेच नदी पात्रात बोटींग, विश्रामगृहाची सुविधा केली जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव