शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रोगराईस आळा घालण्यासाठी जळगावात कचरा व कचराकुंडीमुक्त वार्ड अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:32 IST

स्वच्छतेचा अनोखा उपक्रम

ठळक मुद्देकचरा कुंडय़ांच्या ठिकाणी लावले जनजागृती फलकअतिक्रमण मोहिम व साफसफाईची पाहणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया व इतर वाढत्या रोगराईस आळा बसावा व नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी महाबळ परिसरातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कचराकुंडीमुक्त वार्ड या उपक्रमास जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली. तसेच या उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्याहस्ते करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत कचरा व कचराकुंडीमुक्त वार्ड अभियानाच्या शुभारंभप्रसंगी  जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्यासह प्रभागाच्या नगरसेविका अश्विनी देशमुख, आरोग्य अधिकारी उदय पाटील, विनोद देशमुख यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

नागरीकांचा स्वच्छतेत सहभाग शहरातील नागरीकांचा स्वच्छतेत सहभाग वाढावा, तसेच रोगराईस आळा बसून प्रभागातील नागरीकांचे आरोग्य सुदृढ रहावे, प्रभागात स्वच्छता राहवी, वार्ड कचरा व कचराकुंडी मुक्त रहावा, यासाठी नगरसेविका देशमुख यांनी प्रभागातील सर्व मोकळ्या जागांवर ठेवण्यात आलेल्या कचराकुंडय़ा हटविल्या व कचरा हा फक्त घंटागाडीतच टाकावा, असे ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांकडूनही या आवाहनास प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रभागातील प्रत्येक गल्लीत दररोज घंटागाडी पाठविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

अतिक्रमण मोहिम व साफसफाईची पाहणीजिल्हाधिकारी निंबाळकर यांनी शहरातील अतिक्रमण मोहिम तसेच शहरातीलसाफसफाईची पाहणी केली. शनिवारी सकाळी जिल्हाधिका:यांनी जिल्हा  रुग्णालय परिसराची तसेच अतिक्रमण काढलेल्या सुभाष चौक परिसर, स्टेशन रोड परिसर, राजश्री शाहू महाराज रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या नाटय़गृहास भेट देऊन तेथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.