शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भाजीपाला मार्केटची दहा लाखांवर उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:38 IST

हमाल, मापाडी संघटनेतर्फे बंद

जळगाव : फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटना अध्यक्ष धुडकू सपकाळे यांच्यावर झालेल्या हल्ल््याच्या निषेधार्थ तसेच आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी संघटनेतर्फे फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गुरूवारी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते़ यामुळे या मार्केटची दहा लाखांवरील उलाढाल ठप्प झाली़ या आंदोलनामुळे मंगळवारी शहरात अगदी अल्प प्रमाणात भाजीपाला पोहचू शकला़धुडकू सपकाळे यांच्यावर सोमवारी प्राणघातक हल्ला झाला होता, त्याच्या निषेधार्थ भाजीपाला मार्केटच्या हमाल मापाडी कामगार संघटनेतर्फे व्यापारी, आडत दुकानदार,शेतकऱ्यांनी भर पावसात दुपारी बारा ते अडीच वाजेदरम्यान निदर्शने केली़आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करीत गेट जवळ घोषणाबाजी केली़सुमारे २५़० कामगारांनी यात सहभाग नोंदविला़ सभापती कैलास चौधरी व व्यापारी असोसिएशनला निवेदन देण्यात आले़ भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, दहशत माजविण्यासाठी मोकाटपणे फिरणाºया लोकांवर कारवाई करावी, हमाल कामगारांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, या मागण्या मांडण्यात आल्या़ यावेळी संघटनेचे संजय सपकाळे, रमेश बिºहाडे, संजय बोरसे, नितीन पाटील, शेख इस्माईल शेख हारून बागवान आदी उपस्थित होते़शहरात भाजीपालाच पोहचला नाहींभाजीपाला मार्केटमध्ये सकाळी पाच वाजेपासून लिलाव सुरू होतो़ मात्र, गुरुवारी सकाळी पाच आधी जो माल आला होता, तेवढाच क्षुल्लक प्रमाणात माल शहरात पोहचू शकला़ त्यानंतर व्यापाºयांनी फोन करून माल न आणण्याचे आवाहन केले होते़ लिलाव न झाल्याने बाहेरच थोडाफार माल विकला गेल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे दहा लाखांवर उलाढाल ठप्प होती़ काही विक्रेत्यांनी तर साठ ते सत्तर लाखांची उलाढाल ठप्प असल्याचेही सांगितले़परवाना नूतनीकरणाच्या मागणीबाबत आक्रमकतीन वर्षांपासून हमाल कामगारांच्या परवाना नूतनीकरणाचा विषय गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे, मात्र, वारंवार मागणी करूनही सभापती लक्ष देत नाहीत, या मागणीचाही आंदोलनात उल्लेख करीत या मागणीवरून हे कामबंद आंदोलन बेमुदत काळासाठी पुकारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे़ त्यावेळी पुढच्या बैठकीत हा विषय घेण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले आहे़हमाल कामगारांचा परवाना नूतनी करणासंदर्भात या बैठकीत विषय प्रलंबित ठेवला होता़ पुढच्या बैठकीला संचालक मंडळ यावर निर्णय घेणार आहे, तरी याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले असून बंद मागे घेण्याचेही आवाहन केले आहे- कैलास चौधरी,सभापती

टॅग्स :Jalgaonजळगाव