शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स उलटली, सहा जण जखमी, महामार्गावर पाळधी येथील घटना

By विजय.सैतवाल | Updated: April 27, 2024 15:11 IST

Jalgaon Accident News: धावत्या खासगी ट्रव्हल्सचे टायर फुटून ती उलटल्याने सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात महामार्गावर पाळधी येथे शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला.

- विजयकुमार सैतवाल जळगाव  - धावत्या खासगी ट्रव्हल्सचे टायर फुटून ती उलटल्याने सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात महामार्गावर पाळधी येथे शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात एका जणाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. 

सुरत येथून शुक्रवारी संध्याकाळी सुरत - अकोला ही खासगी ट्रव्हल्स निघाली होती. शनिवार, २७ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात तिचे टायर फुटले व ती उलटली. या अपघातात पठाण गफार खान (४६, रा. सुरत) यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. या सोबतच कौतिक सुपडा गवळी (५०, रा. सुरत), सोनू अंकुश मिस्तरी (२७, सुरत),  आशाबाई सुभाष भोसले (४५, रा. सुरत), विद्या स्वामी निकडे (४०), अर्चना स्वामी निकडे (१२, रा. बुलढाणा)  हे जखमी झाले. 

प्रवासी झोपेत अन् बस उलटलीसकाळी ट्रॅव्हल्स उलटली त्या वेळी अनेक प्रवासी झोपेत होते. बस उलटून अपघात होताच प्रवासी भयभीत झाले व आपल्या सोबतच्या मंडळींना काही झाले तर नाही ना, या चिंतेत पडले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ट्रॅव्हल्स उलटल्याने त्यातील साहित्यही अस्ताव्यस्त पसरले होते. अपघातानंतर प्रवासी रस्त्याच्या कडेला बसून होते. नंतर ते अन्य वाहनाने रवाना झाले. 

अपघातस्थळी पोहचले पालकमंत्रीअपघात झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केले. घटनास्थळी पाळधी दूरक्षेत्र पोलिसही पोहचले होते.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव