शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वाहतुकीच्या कोंडीने नागरिक हैराण, अजिंठा चौकात दीड तास कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:40 IST

चारही दिशांना लागल्या वाहनांच्या रांगा; वाहतूक पोलीस गायब

ठळक मुद्देनाईलाजास्तव वाहनांनी मार्ग बदललाअवजड वाहनांमुळे रहिवासी त्रस्त

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - शहरातील वाहतुकीच्या कोंडीने नागरिक कमालिचे त्रस्त आहेत. कोंडी दूर करण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजिंठा चौकात वाहनांची प्रचंड कोंडी होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. शनिवारी सायंकाळी या चौकात तब्बल दीड तास प्रचंड गोंधळ होता. अशीच स्थिती सूरत रेल्वे गेटनजीक आहे. गेल्या चार दिवसांपासून दुहेरीकरणाची सेवा सुरु झाली. मात्र वारंवार गेट बंद होत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. नियोजनाचा अभाव व हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे, त्याचा फटका नाहक नागरिकांना बसत आहे.कोंडी फोडण्यात प्रशासन अपयशीमहामार्गावरील अजिंठा चौकात शनिवारी सायंकाळी पाच ते साडे सहा या दीड तासात तर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांची ही गर्दी व अजिंठा चौकात होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी 3 महिन्यांपूर्वी सातपुडा शोरुमला लागून असलेले पक्के अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला, मात्र या जागी आता प्रवाशी वाहतूक करणा:या वाहनांचे अतिक्रमण होऊ लागले. त्यामुळे अतिक्रमण व वाहतूक कोंडी दूर करण्याचा हेतूच साध्य झाला नाही. शनिवारी आठवडे बाजार असल्याने शहरात तसेच बाजार समितीत येणा:या वाहनांची संख्या लक्षणिय होती. असे असतानाही अजिंठा चौकात डय़ुटीवर फक्त एकच वाहतूक शाखेचा एकच पोलीस कर्मचारी हजर होता, त्यामुळे ही कोंडी दूर करताना त्याचेही नाकीनऊ आले. नाईलाजास्तव वाहनांनी मार्ग बदलला..भुसावळकडे कालिंका माता चौक, अजिंठाकडे बाजार समिती, शहराकडे एस.टी.वर्कशॉप तर धुळ्याकडेही एक कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी असल्याने अनेक एस.टी.बसचालकांनी महामार्गावरुन न जाता पांडे चौक, नेरी नाका व एस.टी.वर्कशॉप यामार्गे जाणे पसंत केले, त्यामुळे वाहतुकीची आणखीनच कोंडी झाली. प्रवेश नसताना या बसेस शहरातून गेल्या.अवजड वाहनांमुळे रहिवासी त्रस्तशिवाजीनगर पूल बंद असल्याने यावल, चोपडाकडे तसेच विदगावसह इतर गावांकडे जाणा:या बसेसही सूरत रेल्वे गेट या मार्गाने जात असतात़ तसेच डंपर, ट्रक, मालवाहू ही अवजड वाहने याच मागाने ये-जा करतात़ मुक्ताईनगर, गुड्ड राजानगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, गुजराल पेट्रोलपंप भागातील रस्त्यांवरुन वाहनांचा वावर आह़े यामुळे रस्त्याची प्रचंड दैना झाली असून वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचा त्रास वाढला आह़े अपघातांच्या भितीने लहान मुलांना दिवसभर घरात कोंडून ठेवावे लागत़े