शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

जळगावात आता चिकुन गुनिया पसरतोय हातपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 12:38 IST

शहरवासीय त्रस्त : खाजगी रुग्णालयात दररोज 10 ते 12 रुग्ण, डेंग्यूचे 314 संशयीत रुग्ण

ठळक मुद्देडासांमुळे डेंग्यू, चिकुन गुनिया, मलेरिया आजार फवारणीस रेल्वेकडून अडवणूक मनपाकडून उपाययोजना  

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - शहरात डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू पाठोपाठ आता चिकुन गुनियादेखील पाय पसरवू लागला आहे. शहरातील भिकमचंद जैन नगर, नंदनवन कॉलनी, ङोड.पी. कॉलनी तसेच या परिसरातील रेल्वे मार्गानजीकच्या भागात चिकुन  गुनियाचे अधिक रुग्ण वाढले आहेत. या सोबतच शहरातील विविध भागात डेंग्यूचे रुग्ण कमी न होता वाढतच आहे. शहरातील खाजगी दवाखान्यात डेंग्यूच्या रुग्णांचे अहवाल पॉङिाटिव्ह येत असून मनपाकडे डेंग्यूच्या 314 संशयीत रुग्णांची नोंद आहे. दरम्यान, मनपाच्या आरोग्य  विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून आठ उपकरणांद्वारे फवारणी केली जात आहे, मात्र काही भागात मनपाचे कर्मचारी येतच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  शहरात गेल्या महिनाभरापासून डेंग्यू व इतर आजारांनी  हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यातच  साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील महाबळ कॉलनी परिसर, संभाजी नगर, मेहरूण, रामानंद नगर, आदर्श नगर, आयोध्यानगर, वाघनगर, एकनाथनगर यासह विविध भागात यापूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.     आता चिकुन गुनियाचा तापडेंग्यू पाठोपाठ शहरात चिकुन  गुनियाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. डेंग्यू, चिकुन गुनिया, मलेरिया हे सर्व आजार डासांमुळे होतात. यात केवळ डेंग्यू हा स्वच्छ पाण्यातील डासांमुळे होतो. तर उर्वरीत सांडपाण्यात उत्पत्ती झालेल्या डासांपासून होता. शहरातील भिकमचंद जैन नगर, नंदनवन कॉलनी, ङोड.पी. कॉलनी तसेच या परिसरातील रेल्वे मार्गानजीकच्या भागात प्रचंड अस्वच्छता पसरल्याने येथे डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होत असून ते नागरिकांना चावल्याने चिकुन गुनियाची लागण होत आहे. दररोज 10 ते 12 रुग्णमनपा आरोग्य विभागाकडे चिकुन गुनियाच्या रुग्णांची नोंद नसली तरी खाजगी दवाखान्यांमध्ये हे रुग्ण वाढत आहेत. गणेश कॉलनी भागातील खाजगी दवाखान्यात दररोज चिकून गुनियाचे 5 ते 6 रुग्ण व इतर दवाखान्यांमध्ये मिळून दररोज 10 ते 12 रुग्ण उपचारासाठी येत आहे. 

एकनाथनगर, वाघनगर, आयोध्यानगरकडे दुर्लक्ष

रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथनगर या भागातही डेंग्यूचे रुग्ण असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. या भागातील काही मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डेंग्यू असल्याचा अहवाल आला. येथील प्रचंड अस्वच्छतेबाबत नागरिकांनी मनपाकडे तक्रार केली, मात्र इकडे कोणीही फिरकले नाही की साफसफाई केली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सोबतच वाघनगर, आयोध्यानगर भागातही अशीच स्थिती असून वाघनगरात पुन्हा चार, यशवंतनगर, अयोध्यानगरात प्रत्येकी एका जणाला डेंग्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे खाजगी रुग्णालयातील अहवालही पॉङिाटिव्ह आले आहेत.     

चिकुन गुनियाची मनपाकडे नोंद नाहीशहरात चिकुन गुनियाचे रुग्ण आढळत असले तरी या बाबत मनपाच्या आरोग्य विभागाकडे नोंद नाही. शहरात चिकुन गुनिया असल्याचे केवळ ऐकून आले, मात्र आमच्याकडे तसा अहवाल आला नसल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलाणी यांनी सांगितले. 

 मनपाकडून उपाययोजना  डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर मनपाच्यावतीने शहरात सव्रेक्षण करण्यात येत असून सोबतच अबेटींग करण्यासह फवारणी, धुरळणी केली जात असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.     काळजी सवरेत्तम उपाय  डेंग्यूला आळा घालायचा असेल तर नागरिकांनी स्वत:देखील काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. घरातील अथवा परिसरातील साचलेले पाणी नष्ट करा, कोरडा दिवस पाळा अशा विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन डॉ. विकास पाटील यांच्यासह वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.     जीवशास्त्रतज्ज्ञ पद रिक्त  डेंग्यूसह साथरोग पसरण्यास कारणीभूत ठरणा:या डासांचा तसेच कारणांचा अभ्यास करणे व उपाययोजनांसाठी असलेले जीवशास्त्रतज्ज्ञ हे मनपाच्या आरोग्य विभागातील पद रिक्त आहे. सध्या याचा अतिरिक्त पदभार डॉ. विकास पाटील यांच्याकडे आहे. 

रेल्वे मार्गानजीकच्या भागात अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती वाढत असली तरी या ठिकाणी फवारणी करण्यास रेल्वेकडून अडवणूक होत असल्याचे या भागातील सोनी सोनवणे यांनी सांगितले. रेल्वेच्या अखत्यारीत येत असलेल्या  भागात अस्वच्छता असली तरी तेथे फवारणी करण्यास मनपाचे पथक गेले तर तेथे रेल्वेकडून साहित्य जप्त करून  ते भुसावळ येथे नेले जाते, असेही सोनवणे यांनी सांगितले. त्यामुळे फवारणीअभावी डासांचे प्रमाण वाढते. 

-----------शहरात डेंग्यूचे 314 संशयीत रुग्ण आढळले असून उपाययोजना सुरू आहेत. चिकुन गुनिया असल्याचे केवळ ऐकून आहे, मात्र तसा अहवाल आमच्याकडे आलेला नाही. काळजी घेणे हा सवरेत्तम उपाय आहे. - डॉ. राम रावलानी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.

------शहरात सव्रेक्षण करण्यासह उपाययोजना केल्या जात आहे. फवारणी, अबेटिंग करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. - डॉ.  विकास पाटील, आरोग्याधिकारी, मनपा.

------------भिकमचंद जैन नगर, नंदनवन कॉलनी, ङोड.पी. कॉलनी तसेच या भागातील रेल्वे मार्गानजीकच्या परिसरातून चिकुन गुनियाचे दररोज पाच ते सहा रुग्ण उपचारासाठी येत आहेत. दिवसा चावणा:या डासांमुळे हा आजार वाढत आहे. - डॉ. उत्तम चौधरी. 

सध्या  थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहे. यामधूनही अंगदुखी व इतर त्रास होत असतो. डेंग्यू, चिकुन गुनियासारखे लक्षण आढळले तरी रुग्णांचे अहवाल खूप कमी प्रमाणात पॉङिाटिव्ह येतात. - डॉ. गिरीश सहस्त्रबुद्धे.