शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

जळगाव : कामावर आला नाही म्हणून सुपरवायझरने गाठले घर, आणि...

By सागर दुबे | Updated: March 26, 2023 14:37 IST

खेर खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.

जळगाव : नऊ वाजले तरी मजुर कामाला आला नाही म्हणून सुपरवाझरने घर गाठले... दरवाजा ठोठावला पण, घरातून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजेच मजुराने घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली होती. ही घटना एमआयडीसीतील ई-सेक्टरमध्ये रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून विनोद अशोक निमसे (३५, रा.सनावद, ता. बडवा, जि. खरगौन, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मूळचा सनावद येथील रहिवासी विनोद हा चार महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात जळगावात आला होता. एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील एका कंपनीमध्ये मजुर म्हणून काम मिळाल्यानंतर तो कंपनीच्या बाजूलाच पार्टेशनच्या घरामध्ये एकटा राहत होता. शनिवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.मृतदेह दिसताच केला पोलिसांना संपर्क...रविवारी सकाळचे ९ वाजले तरी विनोद हा कंपनीत कामाला आला नाही म्हणून कंपनीचे सुपरवायझर राजेश शर्मा यांनी त्याचे घर गाठले. दरवाजा ठोठावला पण, घरातून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर खिडकीतून घरामध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्यांना विनोद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली.विनोद मोबाईलवर आला भावाचा कॉल...अन् पटली ओळख...आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, किरण पाटील, किशोर बडगुजर व इम्रान सैय्यद यांनी घटनास्थळ गाठले. घराचा दरवाजा तोडून त्यांनी विनोद याला खाली उतरविले. त्याची अंगझडती घेतली पण, त्याची संपूर्ण ओळख पटेल असे काहीही त्याच्याकडे मिळून आले नाही. तेवढ्या विनोद याचा भाऊ आकाश यांचा फोन येतो आणि पोलिसांनी कॉल आला. हा मोबाईल कुणाचा विचारल्यानंतर विनोद याची संपूर्ण ओळख पटली. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी कंपनी मालक रॉबीन नरसी ठक्कर यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास किरण पाटील हे करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव