शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यात दोन ग्रामपंचायतच्या होणार पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:13 IST

ग्रामपंचायतसाठी एकूण 95 उमेदवार रिंगणात : वराड, सावखेडे ग्रामपंचायत, सुजदे व किनोदला सदस्य आणि कुवारखेडय़ाचे सरपंचही बिनविरोध

ठळक मुद्देभादली, सुजदेला पुन्हा प्रक्रिया52 उमेदवार ठरले बिनविरोध45 जणांनी घेतली माघार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण 45 उमेदवारांनी माघार घेतली असून यामध्ये सदस्य पदासाठी 36 तर सरपंच पदासाठी 9 उमेदवारांनी माघार घेतली.   दरम्यान, वराड बुद्रुक व सावखेडा खुर्द ग्रामपंचयातचे सरपंच व सर्व सदस्य बिनविरोध ठरले आहे. या सोबतच सुजदे व किनोद ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध ठरले असून येथे सरपंचपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज असल्याने तेथे केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. कुवारखेडय़ाचही सरपंच बिनविरोध ठरले आहेत. विशेष म्हणजे सुजदे ग्रामपंचायतची सात सदस्य संख्या असताना येथे केवळ सहाच अर्ज दाखल झाल्याने व भादली खुर्द येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने येथे पोटनिवडणूक होणार असल्याचे चित्र आहे.  अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया  15 सप्टेंबर पासून सुरू झाल्यानंतर एकूण 197 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये 161 अर्ज सदस्य पदासाठी तर 36 अर्ज सरपंचपदासाठी होते. यामध्ये छाननीत पाच अर्ज बाद ठरल्याने केवळ 192 अर्ज शिल्लक होते. यामध्ये भादली खुर्दच्या चार सदस्यपदासाठीचे अर्ज आणि जळके येथील सदस्यपदाचा एक अर्ज अवैध ठरला होता. माघारीच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण 45 उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये किनोद येथील सदस्यपदासाठीच्या दाखल 11 अर्जांपैकी चार अर्ज मागे घेण्यात आल्याने सात सदस्या संख्या असलेल्या या ग्रामपंचायतचे सदस्य बिनविरोध ठरले आहे. तर सरपंचपदासाठी दाखल चार पैकी दोन अर्ज मागे घेतल्याने दोन अर्ज कायम आहे. त्यामुळे येथे केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. कुवारखेडा ग्रामपंचायतच्या सदस्यपदासाठी दाखल 12 अर्ज आणि सरपंचपदासाठीच्या एक अर्ज मागे घेण्यात आला. वसंतवाडी येथे सदस्यपदासाठी दाखल 4 अर्ज आणि सरपंचपदासाठीच्या एक अर्ज मागे घेण्यात आला. भादली खुर्द येथे सदस्यपदासाठीचे चार अर्ज मागे घेण्यात आले. विदगाव येथे सदस्यपदासाठी दाखल 5 अर्ज आणि सरपंचपदासाठीचे 2अर्ज मागे घेण्यात आले आणि भोलाणे येथे सदस्यपदासाठी दाखल 3 अर्ज आणि सरपंचपदासाठीच्या एक अर्ज मागे घेण्यात आले. 

11 ग्रामपंचायतसाठी एकूण 52 उमेदवार बिनविरोध ठरले असून यात तीन सरपंच तर 49 सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये सावखेडे आणि वराड येथील प्रत्येकी सात-सात सदस्य, एक-एक सरपंच, कुवारखेडे येथील सरपंच बिनविरोध ठरण्यासह जळके (6),   वसंतवाडी(5), किनोद (7), कुवारखेडे (2), भादली खु.(2), विदगाव ( 6),    सुजदे (6), भोलाणे (1) येथील एकूण 49 सदस्य बिनविरोध ठरले. 11 पैकी घार्डी ही एकमेव अशी ग्रामपंचायत आहे, जेथे एकही सदस्य अथवा सरपंच बिनविरोध ठरलेले नाही. 

भादली खुर्द येथे  अ.जमातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने सरपंचपदासाठी आणि  सुदजे येथे सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतसाठी सहाच अर्ज आल्याने तेथे एक सदस्यासाठी पोट निवडणूक होणार आहे.