शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

जळगावात पोलीस अधीक्षकांनी पकडला १० लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:15 IST

६ ठिकाणी धाडसत्र

ठळक मुद्देसाडेसहा तास कारवाईशहरात पहिल्यांदाच झाली पोलिसांकडून मोठी कारवाई

जळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी दुपारी अचानकपणे गुटखा विक्रेत्यांच्या गोदामांची तपासणी केली. गोलाणी मार्केट, मानसिंग मार्केट, चोपडा मार्केट, शाहू नगर व नशिराबाद या सहा ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल १० लाखाच्यावर गुटखा जप्त करण्यात आला आहे. दुपारी साडे तीन ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच पोलिसांकडून कारवाई झाली आहे.महाराष्टÑात गुटखा बंदी असतानाही शहरात गुजरात व मध्य प्रदेशातून कंटेनरद्वारे मोठ्या प्रमाणात गुटखा आयात केला जातो. शहरात गुटखा किंग यांचे मोठमोठे गोदाम असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन गोदामांची तपासणी केली. गोलाणी मार्केटमधील शिव डिस्ट्रीब्युटर्स येथे शिंदे यांनी तळमजल्यात तब्बल अर्धा तास तपासणी केली. मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.असा केला पर्दाफाश...एका चार चाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुरुवारी दुपारी तीन वाजता मिळाली होती. शिंदे यांनी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांना अजिंठा चौकात सापळा लावण्याचे आदेश दिले. वर्णनावरुन हे वाहन चौकातच अडविण्यात आले. तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला. हा गुटखा कोठून आणला याची माहिती काढली असता चालकाने गोलाणी मार्केटमधील शिव डिस्ट्रीब्युटर्सचा पत्ता दिला. त्यानुसार कुनगर व पोलीस अधीक्षक शिंदे तेथे दाखल झाले. तळघरात तपासणी केली असता तीन लाखाच्या जवळपास गुटखा आढळून आला.या दुकानामध्ये सापडला गुटख्याचा साठाशिव डिस्ट्रीब्युटरर्स (गोलाणी मार्केट), पंकज पान मसाला सेंटर, लक्ष्मी पान मसाला (मानसिंग मार्केट), विजय मिश्रा (शाहू नगर), संतोष ट्रेडर्स (चोपडा मार्केट) व नशिराबाद येथील गणेश चव्हाण याच्या मालकीच्या बोदवड रस्त्यावरील गोदामात कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.शहरात एकाचवेळी धाडसत्रशहरातील गुटखा गोदामांची माहिती मिळाल्यानंतर शिंदे यांनी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना या गोदामांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या. वेगवेगळ्या पथकाने एकाच वेळी गोदामांची तपासणी केली.गोलाणी मार्केटमध्ये दिलीप बदलानी व राकेश बढेजा यांचे शिव डिस्ट्रीब्युटर्स, रेल्वे स्टेशन परिसरातील मानसिंग मार्केटमध्ये पंकज पान मसाला सेंटर, श्री लक्ष्मी पान मसाला सेंटर, शाहू नगरमधील विजय मिश्रा याच्या मालकीचे गोदाम, चोपडा मार्केटमध्ये संतोष ट्रेडर्स व नशिराबाद येथे गणेश चव्हाण याच्या मालकीच्या गोदामात छापे टाकण्यात आले.सहा ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किमंत १० लाखाच्यावर आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत गुटख्याची किंमत काढली जात होती.शहर किंवा जिल्हा कुठेही गुटख्याची विक्री होत असेल किंवा गोदामात साठविण्यात आला असेल तर त्याची माहिती नियंत्रण कक्ष किंवा थेट आपल्याला कळवावी. माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवले जाईल.-दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागJalgaonजळगाव