शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांना उद्या अनुभवता येणार 'शून्य सावलीचा क्षण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. परंतु, मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. परंतु, मंगळवारी ही सावली काही क्षणासाठी आपली साथ सोडणार आहे. मंगळवार, दि. २५ मे रोजी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभव घेता येणार आहे. निसर्गाच्या या अद्भुत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ म्हणतात.

इन्फो :

काय आहे ‘शून्य सावली दिवस'

पृथ्वी आपल्या २३.५ अंशातून झुकलेल्या अक्षासह सूर्याभोवती फिरते; पण पृथ्वीवरून बघताना आपल्याला सूर्य कधी उत्तर, तर कधी दक्षिण दिशेकडे सरकतोय असा भास होतो, ज्याला आपण उत्तरायण व दक्षिणायन म्हणतो. पृथ्वीवरील आपले भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी आडव्या आणि उभ्या काल्पनिक रेषा असतात. आडव्या रेषांना अक्षांश आणि उभ्या रेषांना रेखांश असे म्हणतात. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या प्रवासाच्या काळात सूर्य रोज वेगवेगळ्या अक्षांशावर उगवतो, ज्याला ‘सूर्याची क्रांती’ असे म्हणतात. २१ मार्च रोजी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्त म्हणजे ० अक्षांशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो. आपण उत्तर गोलार्धात विषुववृत्त आणि कर्कवृत्ताच्या मध्ये २१.०० अंश उत्तर (२१.००° एन) या अक्षांशावर आहोत. असे प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. २१ मार्च ते २१ जून या उत्तरायणाच्या काळात २५ मे रोजी सूर्याचे डेक्लिनेशन आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. २५ मे रोजी सूर्य २१०० अक्षांशावर उगवतो. त्यादिवशी १२ वाजून २४ मिनिटे ४५ सेकंद यावेळी आपण ‘शून्य सावलीचा क्षण’ अनुभवतो. २१ जूननंतर परतीच्या प्रवासात १६ जुलैला सूर्याचे डेक्लिनेशन (सूर्याची क्रांती) परत आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे ‘शून्य सावलीचा क्षण’ अनुभवण्यास मिळतो.

इन्फो :

ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य नसल्यामुळे शहरातील खगोलप्रेमी अमोघ जोशी या खगोलीय घटनेचे साक्षात्कार होण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे दुपारी १२ वाजेपासून थेट प्रक्षेपण फेसबुकच्या माध्यमातून पाहण्याचे आवाहन जोशी यांनी केले आहे.