शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निधी वितरण व खर्च टक्केवारीत जळगाव राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

By ajay.patil | Updated: August 20, 2023 19:26 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन : ४० कोटींचा निधी आतापर्यंत खर्च

जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी प्राप्त निधीचे वितरण व खर्चाच्या तुलनेत जळगाव जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत मुंबई उपनगर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५१० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ३० टक्के रक्कम म्हणजे १५३ कोटी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (बीडीएस)वर प्राप्त झाले आहेत. कार्यान्वयीन यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावानुसार, ५६ कोटी ७९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला होता.

त्यापैकी ४० कोटी ६६ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत खर्च झाला आहे. मिळालेल्या निधीच्या तुलनेत जिल्ह्याचे निधी वितरण ३७.१२ टक्के व खर्चाचे प्रमाण २६.५८ टक्के आहे. एकूण निधीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात एकूण ७ टक्के खर्च झाला आहे. निधी वितरण व खर्चाच्या तुलनेने जळगाव जिल्हा मुंबई उपनगरनंतर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दोनवेळा आढावाजिल्हाधिकारी पदाचा आयुष प्रसाद यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व कार्यान्वयीन यंत्रणांच्या दोनदा आढावा बैठका घेऊन निधी मागणी प्रस्ताव तत्काळ सादर करणे, प्राप्त निधी मागणी प्रस्तावानुसार निधी वितरित करणे आणि खर्चाचे प्रमाण वाढविणे याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या. जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केल्याने जळगाव जिल्ह्याने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्हा नियोजन समितीची वेळोवेळी राज्यस्तरावरील आकडेवारी प्रसिद्ध होत असते. एक महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक होता. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेला आढावा व सूचनांमुळे जिल्ह्याचा नियोजन खर्च चांगला झाला आहे.

निधी वितरण व खर्चाच्या टक्केवारीतील टॉप पाच जिल्हेजिल्हा - एकूण खर्चाच्या तुलनेत झालेला खर्च१. मुंबई उपनगर - १३.६३ टक्के२. जळगाव - ७.६० टक्के३. गडचिरोली - ७.४७ टक्के४. यवतमाळ - ५.६३ टक्के५. सोलापूर - ५.४३ टक्के

टॅग्स :Jalgaonजळगाव