शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून जळगाव-पुणे विमान सेवा होणार सुरू, जळगाव-गोवा सेवा दररोज; तिकीट बुकिंगला सुरुवात

By विलास बारी | Updated: May 25, 2024 00:17 IST

Jalgaon News: विमानतळावरून गेल्या महिन्यात गोवा - जळगाव - हैदराबाद अशी विमान सेवा ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सुरू केली. या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमान सेवा सुरू करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती.

- विलास बारीजळगाव  - विमानतळावरून गेल्या महिन्यात गोवा - जळगाव - हैदराबाद अशी विमान सेवा ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सुरू केली. या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमान सेवा सुरू करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती. त्यानुसार विमान कंपनीने पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता सोमवार, २७ मेपासून पुणे येथे विमान सेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार दिवस राहणार आहे.

भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उड्डाण ५.० योजने अंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लॉय ९१’ विमान कंपनीने विमान सेवा सुरू केली आहे. १८ एप्रिलपासून गोवा, हैदराबादला विमान सेवा सुरू केली आहे. तसेच जळगाव - पुणे विमान सेवादेखील सुरू करावी, अशी मागणी व्यापारी तसेच नागरिकांकडून करण्यात आली होती. विमान कंपनीने २५ व २६ रोजी जळगाव ते पुणे अशी विमान सेवा दोन दिवस ट्रायल बेसवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गोव्यावरून जळगावला तर जळगाववरून पुण्याला व पुण्यावरून जळगाव आणि नंतर गोव्याला विमानाने शुक्रवारी उड्डाण केले.

तिकिट बुकिंगला सुरुवातविमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबरदरम्यान गोवा-जळगाव-पुणे या विमान सेवेचे शेड्युल तयार केले आहे. त्यानुसार तिकीट बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. यात गोवा-जळगाव-गोवा ही सेवा दररोज तर पुणे-जळगाव-पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पाठपुराव्यास यशमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी व त्यांचे शिष्टमंडळ हे दीड वर्षापासून जळगाव ते पुणे, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, इंदोर आदी ठिकाणी विमान सेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न करीत होते. नागरिक उड्डयन मंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री यांची भेट घेत चर्चा केली होती. महाराष्ट्र चेंबरचे मेंबर नितीन इंगळे, महेंद्र रायसोनी, संगीता पाटील, किरण बच्छाव, पुरुषोत्तम टावरी यात सहभागी होते.

टॅग्स :airplaneविमानJalgaonजळगाव